Home /News /pune /

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल, मुळासकट वाहून गेलं कांद्याचं पीक

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल, मुळासकट वाहून गेलं कांद्याचं पीक

अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याच्या घटना पुन्हा एकदा समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसानं (heavy rainfall in Maharashtra) पिकांचं मोठं नुकसान केलं आहे.

    पुणे, 11 सप्टेंबर: अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याच्या घटना पुन्हा एकदा समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसानं (heavy rainfall in Maharashtra) पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आळंदीमधील फुलगाव याठिकाणच्या शेतकऱ्याच्या कांदा पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. प्रभाकर खुळे या शेतकऱ्याच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. या पावसामुळे एक हेक्टर क्षेत्रात लावण्यात आलेल्या कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. खुळे यांच्या शेतात डोंगरावरून आणि इतर परिसरातून पाणी आल्याने कांद्याचं पीक मुळासकट वाहून गेलं आहे. दीड महिन्यांच्या या पिकाचं मोठं नुकसान झाल्याने प्रभाकर खुळे हवालदिल झाले आहेत. अवकाळी पावसात पीक वाहून गेल्याने खुळे यांचं जवळपास 80 हजारांचे नुकसान झाले आहेत. सामनाने याबाबत वृत्त दिले आहे. हे वाचा-कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर वाढला;पुढील 5दिवस पुण्याला हवामान खात्याचा इशारा पावसाचा जोर वाढणार आजपासून पुढील पाच दिवस कोकण, घाट परिसर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं आज पुणे रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना IMD कडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Pune rain, Rain, Rain fall, Weather

    पुढील बातम्या