पुणे, 4 ऑक्टोबर : गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्याला जोरदार पावसानं झोडपलं होतं. या पावसानं पुण्याच्या अनेक भागात प्रचंड पाणी साठलं आणि दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्या- नाल्यांचं पाणी घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये, वस्त्यांमध्ये शिरलं. या पावसाने पुणे जिल्ह्यात 17 बळी घेतले होते. त्या 25-26 ऑक्टोबरच्या भीषण पावसाची आठवण देणारा पाऊस पुन्हा एकदा शुक्रवारी दुपारी बरसला. आकाश काळवंडलं आणि दुपारी 4 च्या सुमारास धुवांधार पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसाने काही वेळातच रस्ते जलमय झाले.
कात्रज, वारजे या भागात पुन्हा एकदा पाणी साठलं. म्हात्रे पूल परिसरही जलमय झाला. व्हॉट्सअॅपवर अफवांना पेव फुटलं. एक तासभर तुफान पाऊस बरल्यानंतर थोडा जोर कमी झाली तरी पावसाची रिमझिम शहराच्या अनेक भागात सुरू होती.
वाचा - चंद्रकांत पाटलांच्या विरोधात कोथरुडमध्ये ठिकठिकाणी झळकले असे पोस्टर्स
याचा सर्वाधिक फटका दुचाकी आणि चारचाकी वाहनांना बसला. जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता पाण्याने आणि वाहनांनी तुंबले होते. दत्तवाडी भागात पाणी साचलं होतं. एक तासभर प्रचंड पाऊस कोसळला.
उद्याही पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 5 ऑक्टोबरला महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस होणार आहे.
25 आणि 26 सप्टेंबरला कोसळलेल्या पावसाने पुणे परिसराची दैना उडाली होती. अनेक सोसायट्यांमध्ये पुढचे 2 दिवस चिखल गाळ साठला होता. गाड्याही वाहून गेल्यानं मालमत्तेचं मोठं नुकसान झालं होतं. कात्रज आणि वारजे परिसरात सगळ्यात जास्त हानी झाली होती. आजचा पाऊसही याच भागात बरसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, मान्सून परतण्याची तारीख लांबल्यामुळे आणखी काही दिवस असा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
----------------------------------------------------------
VIDEO : असा आहे युतीचा फॉर्म्युला, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केलं जाहीर
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा