• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • Pune rain : पुण्यात पावसाने धुमशान, घराबाहेर न पडण्याचे आवाहन, रौद्ररुपाचा पहिला VIDEO

Pune rain : पुण्यात पावसाने धुमशान, घराबाहेर न पडण्याचे आवाहन, रौद्ररुपाचा पहिला VIDEO

पुण्यात आज संध्याकाळी अचानक वातावरणामध्ये बदल झाला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने धुमशान घातले आहे.

  • Share this:
    पुणे, 04 ऑक्टोबर : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे (marathwada rain) हाहाकार उडाला आहे. तर दुसरीकडे पुण्यात (heavy rain in pune) अचानक वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये पाणी साचले आहे. घरातून बाहेर न निघण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुण्यात आज संध्याकाळी अचानक वातावरणामध्ये बदल झाला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने धुमशान घातले आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार,  पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या 12 ते 15 किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा' असं आवाहन करण्यात आलं आहे. तर पुणे रेल्वे स्थानक परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुडघ्या पाणी साचले आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांचे अतोनात हाल झाले आहे. पालिका प्रशासनाने सुद्धा घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सावध राहा! सार्वजनिक शौचालयातच दबा धरून बसलाय जंगलाचा राजा; हा VIDEO कुठला पाहा तर पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या पुणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा, असं आवाहन महापौर मोहोळ यांनी केलं आहे. पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या @PMCPune च्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. मदतीसाठी संपर्क साधा आपत्ती व्यवस्थापन मदत व सेवा केंद्र ०२०-२५५०६८००/१/२/३/४ ०२०-२५५०१२६९
    Published by:sachin Salve
    First published: