कहर! पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी

कहर! पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं; अनेक घरांमध्ये पाणी

पुण्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसानं झोडपलं. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढचे 48 तास धोक्याचे आहेत.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे

पुणे, 22 ऑक्टोबर : पुणे शहर आणि परिसरात पुन्हा एकदा झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. संध्याकाळी अंधारून आलं आणि पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दरम्यान पहाटे झालेल्या पावसामुळे अनेक घरात पाणी शिरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मध्यरात्री बारा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली त्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे शहरात असणारे ओढे-नाले भरून वाहू लागले तर शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. अनेक भागातील रस्त्यांवरही पाणी साचले आहे. रात्री झालेल्या या मुसळधार पावसामुळे पुणेकरांना पुन्हा एकदा ढगफुटीसदृश पावसाची आठवण झाली.

कात्रज परिसरातील नवीन वसाहत येथील ओढा भरून वाहू लागला असून त्याचे पाणी नवीन वसाहतीतील अनेक घरात शिरले आहे. येरवड्यातील शांतीनगर वसाहत, घोरपडी गाव, वानवडीतील आझादनगर , बी.टी.कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड येथील अनेक घरांमध्येही पाणी शिरलं आहे. या भागात अग्निशमन दलाच्या जवानांनी पाचारण करण्यात आलं.

Alert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

लोहगाव जकात नाक्याजवळ एका खाजगी कंपनीची बस पाण्यात अडकून पडली होती. या बसमध्ये 20 कर्मचारी अडकून पडले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने या सर्वांना सुखरूप बाहेर काढले.

पुढचे 48 तास आहे धोका

पुण्यासह राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने दिला इशारा. पुण्यात आज रात्री परत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या २७ ऑक्टोबर पर्यत राज्यात पाऊस राहणार आहे. बंगाल व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाली आहे.

8 राज्यांना Alert

मुंबई वेधशाळेने 8 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ या जिल्ह्यांमध्ये काही भागात वादळी वाऱ्यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत सतर्कतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा देण्यात आला आहे.

-------------------------------------

रस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या