'पैसे नसतील तर बायकोला पाठव' मुथूट होमफिनच्या महिला एजंटचं धक्कादायक विधान

'पैसे नसतील तर बायकोला पाठव' मुथूट होमफिनच्या महिला एजंटचं धक्कादायक विधान

कर्ज वसूल करण्यासाठी या महिला एजंट कोणत्या थराला जाऊ शकतात याची प्रचिती देणारी एक ऑडिओ क्लिप न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे, 09 ऑक्टोबर : एका कर्ज वसुली करणाऱ्या महिला एजंटचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्ज वसूल करण्यासाठी या महिला एजंट कोणत्या थराला जाऊ शकतात याची प्रचिती देणारी एक ऑडिओ क्लिप न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहे. पुण्याचे नागरिक प्रभाकर कुतवळ यांना सुप्रसिद्ध मुथूट होमफिन या कंपनीने नेमलेल्या थर्ड पार्टी वसुली एजंट महिलांनी हफ्ता वेळेवर दिला नाही म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली आहे.

फोन करून कर्ज देता येत नाही म्हणून भिकारी म्हणत अपशब्दही वापरले असल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये आहे. एवढं करून या महिला थांबल्या नाहीत तर तुझ्याकडे पैसे नसतील तर बायकोला पाठव असं संतापजनक विधानही या महिलांनी केलं. या संपूर्ण प्रकाराची कुतवळ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, महिलांनी अशा प्रकारे वागल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या - BJP कार्यालयात गायीचं कापलेलं डोकं घेऊन जाणाऱ्याला शिवसेनेनं दिली उमेदवारी!

या सगळ्या प्रकरणावर मुथूट कंपनीला विचारलं असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राजेंद्र कोकाटे या पुण्यातील व्यवस्थापकांशी संपर्क केला असा मी पुण्यात नसून कोल्हापूरला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

कुतवळ यांनी संबंधित ऑडिओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. या क्लिपमध्ये अपशब्द वापरले असल्यामुळे आम्ही ती तुम्हाला ऐकवू शकत नाही. तर पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत. पण कंपनी या प्रकरणात उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

इतर बातम्या - पवार कुटुंबातील तरुणांना ऑफर, भाजपमध्ये प्रवेशाचे दरवाजे खुले

दरम्यान, ग्राहकाशी अशा प्रकारे वार्ता करणाऱ्या महिला एजंटवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी कुतवळ यांनी केली आहे. तर पोलीस संबंधित महिलांची चौकशी करून त्यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या - छगन भुजबळांना मोठा धक्का, या NCP नेत्याने दिला शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2019 02:35 PM IST

ताज्या बातम्या