'कोंबड्या अंडी देत नाहीत', पुण्यातील पोल्ट्री फार्म मालकाची पोलिसांत तक्रार

'कोंबड्या अंडी देत नाहीत', पुण्यातील पोल्ट्री फार्म मालकाची पोलिसांत तक्रार

पुण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. कोंबड्या अंडी देत नाहीत म्हणून पोल्ट्री मालकाने चक्क पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

  • Share this:

पुणे, 21 एप्रिल: पुणे जिल्ह्यातून (Pune District) एक वेगळीच घटना समोर आली आहे. कारण, एका पोल्ट्री चालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे की त्याच्या कोंबड्या अंडी (Eggs) देत नाहीयेत. आश्चर्य वाटलं ना? पण असं खरोखर घडलं आहे आणि ते सुद्धा पुण्यात. पोल्ट्री मालकाने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. पाहूयात हा नेमका प्रकार काय आहे आणि या व्यक्तीने पोलिसांत तक्रार का दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथील एका पोल्ट्री चालकाच्या फार्ममधील काही कोंबड्यांनी अंडी देणं अचानक बंद केलं. कोंबड्या अंडी देत नाहीत यामुळे हा पोल्ट्री फार्म मालकही चिंतेत होता कारण त्याला आर्थिक नुकसान होत होतं. अखेर त्याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले की, "तक्रारदार व्यक्तीचं पोल्ट्री फार्म आहे. त्याला आणि त्याच्या भागातील आणखी चार मालकांना अशीच समस्या भेडसावत होती. त्यानंतर त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार दाखल करण्याचं ठरवलं."

वाचा: बारामती पोलिसांची मोठी कारवाई; पंजाबमधून विक्रीसाठी आणलेल्या तलवारींचा साठा जप्त

तक्रारदारने सांगितले की, त्याने अहमदनगर जिल्ह्यातील एका कंपनीकडून कोंबड्यांसाठीचे खाद्य खरेदी केलं होतं. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले की, "तक्रारदार व्यक्तीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, कोंबड्यांना खाद्य दिल्यानंतर त्यांनी अंडी देणं बंद केलं."

या प्रकरणी पोलिसांनी अहमदनगर येथील संबंधित कंपनीशी संवाद साधला आणि याची माहिती घेतली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून पशूवैद्यांसोबत चर्चा करुन तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First published: April 21, 2021, 10:52 PM IST
Tags: crimepune

ताज्या बातम्या