हुक्का पार्लर चालू देण्यासाठी पुण्यात पोलिसांची हफ्तेखोरी

हुक्का पार्लर चालू देण्यासाठी पुण्यात पोलिसांची हफ्तेखोरी

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे

10 एप्रिल : पुणे पोलिसांच्या भ्रष्टाचाराच्या एकापेक्षा एक सुरस कथा शहरात चर्चेला येत असतात आता पुन्हा नव्याने व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपने पुणे पोलीसांची इभ्रत पुन्हा वेशीवर टांगली आहे. लष्कर पोलीस स्टेशनच्या पीएसआय गुजरने हुक्का पार्लर उशिरा चालू द्यावं, यासाठी या हॉटेलच्या मालकाला हफ्ते मागून बेजार केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. पोलिसांना हफ्ते देऊन ही कर्मचाऱ्यांच्या वादातून या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. आपण आयुक्त, सहआयुक्त कुणाकडे ही तक्रार केली  तरी घाबरत नसून पैसे दिले तरच हॉटेल चालू राहील असा दम ही दिला आहे.

पुणे शहरात सध्या 100 हुक्का पार्लर सध्या सुरू आहेत. हे हुक्का पार्लर सुरू ठेवण्यासंबंधी सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. पुण्यातल्या कॅम्प परिसरात अनेक हुक्का पार्लर रात्री जोरात सुरु असतात. त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळतो . सुजीस या हुक्का पार्लरला उशिरा पर्यंत हॉटेल सुरु राहू देण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागताहेत. जवळपास सगळ्याच हुक्का पार्लरची हीच परिस्थिती आहे. लष्करच्या हद्दीत असलेल्या या पार्लरसाठी मालक विनय, हे टाव्वळ एक लाख रुपयाच्या आसपास पैसे हफ्ता म्हणून पोलिसांना देतात. मात्र याच पैशावरून वाद झाल्याने लष्कर चे पीएसआय गुजर यांनी वेगळे पैसे या मालकाला मागितले आणि ते दिले  पुन्हा हॉटेलवर कारवाई ही केली.

हुजरे यांनी केवळ पैसेच माहीतले एवढाच नाही तर तक्रार करायची असेल तर अगदी आयुक्त आणि सहायुक्तांकडे जा आपलं कुणीही काही करू शकत नाही असा उर्मट प्रचार हि केला. पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पदभार घेताना स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता त्यांचे अधिकारीच जर धुवून लावत असतील तर याचा अर्थ काय लावायचा?

नाही म्हणायला पोलिसांनी आता यासंदर्भात सहाय्यक आयुक्त यांची चौकशी नेमली आहे.

पोलीस हफ्ते घेतात ही बाब आता काही नवीन राहिली नाही. मात्र, पैसे वाटून घेताना सोबतच्या कर्मचाऱ्यांशी वादावादी झाल्यावर, पुन्हा पैसे देणाऱ्याचा गळा पकडायचा हा प्रकार मात्र भयंकर आहे.

First published: April 10, 2017, 3:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading