• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • नियम म्हणजे नियम! KKR च्या खेळाडूवर पुणे पोलिसांची कारवाई

नियम म्हणजे नियम! KKR च्या खेळाडूवर पुणे पोलिसांची कारवाई

पुण्यात मास्क न घालता प्रवास करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) खेळाडूवर पुणे पोलिसांनी (Pune Police) कारवाई केली आहे.

 • Share this:
  पुणे, 29 मे : कोरोना व्हायरसच्या (coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता नव्या नियमानुसार प्रवास करताना मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. विनामास्क किंवा विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस कारवाई करत आहेत. पुण्यात मास्क न घालता प्रवास करणारा कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) खेळाडू राहुल त्रिपाठीवर (Rahul Tripathi) पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकात राहुलवर कारवाई झाली आहे. काय घडले प्रकरण? राहुल शुक्रवारी दुपारी त्याच्या कारमधून सासवडहून खडकीमध्ये जात होता. त्या दरम्यान खडीमशीन चौकात  विनामास्क प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई  करण्यात येत होती. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये राहुलने तोंडाला मास्क न लावल्याचे आढळले. त्यावेळी त्याला 500 रुपयांचा आर्थिक दंड ठोठवण्यात आला. 'आम्ही राहुलला त्याची चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याने तातडीने दंड भरला.' अशी माहिती कोंढवा पोलीस स्थानकाचे उपनिरिक्षक संतोष सोनावणे यांनी दिली. पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये सध्या मास्क न घालता प्रवास करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद,नाशिक या शहरांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हजारो रुपयांच्या दंडाची रक्कम गोळा करण्यात आली आहे. इशान किशनच्या गर्लफ्रेंडने पोस्ट केला HOT PHOTO, चाहते म्हणाले... आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याने राहुल पुण्यात राहुल त्रिपाठी हा शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित होण्यापूर्वी त्याने 7 मॅचमध्ये 135.50 च्या स्ट्राईक रेटने 187 रन केले होते. आयपीएल स्पर्धेतील सहभागी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याने ही स्पर्धा 4 मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: