पुणेकरांनो हे आहेत तुमचा जीव वाचवणारे खरे रक्षक, हा VIDEO नक्की बघा

पुणेकरांनो हे आहेत तुमचा जीव वाचवणारे खरे रक्षक, हा VIDEO नक्की बघा

पुणे पोलिसांनी प्रसिद्ध केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याशिवाय राहणार नाही.

  • Share this:

पुणे, 19 एप्रिल : संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या माहामारीचा सामना करत आहे. या संकटाने देशाला एका वेगळ्याच ठिकाणी आणलं आहे. या संसर्गजन्य रोगाचा सामना करण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण अशात अत्यावश्यक सेवा पुरवाणारी मंडळी अजूनही आपल्या देशासाठी झगडत आहेत. या खऱ्या कोरोना वॉरिअर्सना पुणे पोलिसांनी मानाचा मुजरा केला आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यामध्ये देशासाठी आपला जीव पणाला लावणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले आहेत.

हा व्हिडिओ शूट करताना 'मेरी नस-नस में तेरा इश्क़ बहे' त्यामध्ये या गाण्याचा वापर केला आहे. आपला देश आणि या मातीशी जुळलेली आपली नाळ जपण्यासाठी कुटुंबाची आणि स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता हे खरे हिरो आपल्यासाठी काम करतात. त्यांच्या कामाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे पोलिसांनी हा व्हि़डिओ तयार केला आहे.

यामध्ये आपल्या देशाच्या हितासाठी आणि नागरिकांसाठी लढणाऱ्या नर्स, डॉक्टर, पोलीस अधिकारी, सरकारी कर्मचारी आणि सफाई कामगार यांना धन्यवाद देऊन त्यांच्या कामाचं स्वरुप लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. आम्ही तुमच्यासाठी राबत आहोत पण तुम्ही घरीच राहा आणि सुरक्षित राहा असा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी प्रसिद्ध केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी घरीच राहा आणि आपली काळजी घ्या.

संपादन - रेणुका धायबर

First published: April 19, 2020, 3:12 PM IST

ताज्या बातम्या