'तुझ्यात जीव रंगला'मधील राणादाच्या वडिलांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी

'तुझ्यात जीव रंगला'मधील राणादाच्या वडिलांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी

मिलिंद दस्ताने आणि त्यांची पत्नी सायली दस्ताने यांनी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या औंध येथील दुकानातून 25 लाख रुपयांच्या दागिन्यांची खरेदी केली होती.

  • Share this:

पुणे, 18 जून : 'पीएनजी ब्रदर्स' फसवणुकीप्रकरणी 'तुझ्यात जीव रंगला'मधील राणादाच्या वडिलांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील राणादादाचे वडील मंत्री प्रतापराव गायकवाड अर्थात अभिनेते मिलिंद दस्ताने यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांआधी पीएनजी ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी आता त्यांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. क्षय गाडगीळ यांनी या प्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मिलिंद दस्ताने आणि त्यांची पत्नी सायली दस्ताने यांनी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या औंध येथील दुकानातून 25 लाख रुपयांच्या दागिन्यांची खरेदी केली होती.

मात्र, या खरेदी केलेल्या दागिन्यांचे त्यांनी वर्षभरानंतरही पैसे दिले नाहीत. आपली एक मालमत्ता विक्री करायची असून त्यातून ३ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ही रक्कम दागिन्यात गुंतवायची असल्याचे मिलिंद आणि त्यांच्या पत्नीने सांगितलं होतं. त्यांनी 25.69 लाख किंमतीचे एक किलो सोन्याचे दागिने खरेदी केले होते. मात्र, रक्कम एकत्रित देण्याऐवजी हप्त्यांवर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

अखेर, वर्षभरानेही त्यांनी थकलेली रक्कम न दिल्याने शेवटी गाडगीळ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात

आता पुणे पोलिसांनी निर्णय देत दस्ताने यांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 VIDEO: प्रभू देवासारखं बसच्या टपावर तरुणांचं 'उर्वशी उर्वशी',ब्रेक लागताच आपटले जमिनीवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 07:13 PM IST

ताज्या बातम्या