मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात पहिला गुन्हा दाखल, कोरोनाची अफवा पसरवणं पडलं महागात

पुण्यात पहिला गुन्हा दाखल, कोरोनाची अफवा पसरवणं पडलं महागात

चुकीची माहिती दिल्याप्रकरणी या तरुणाविरोधात कोरोगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

चुकीची माहिती दिल्याप्रकरणी या तरुणाविरोधात कोरोगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

चुकीची माहिती दिल्याप्रकरणी या तरुणाविरोधात कोरोगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
पुणे, 16 मार्च : देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गासोबतच अनेक अफवांनाही उधाण आलं आहे. कोरोनासंर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्यात अशीच एक अफवा पसरवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिद्ध हॉटेलमध्ये राहात असलेल्या परदेशातील काही पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा या तरुणानं दिली होती. या तरुणानं एका हेल्पलाईनवरून या संदर्भात माहिती दिली होती आणि सोशल मीडियावरही अफवा पसरवल्यानं या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला असतानाही पुण्यामध्ये सोमवारी हा प्रकार घडला. या तरुणाविरोधात कोरोगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेज किंवा इतर फोटोही न तपासता फॉर्वड न करण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी Work From Home करताय? मग लक्षात ठेवा या गोष्टी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. या कायद्याचा भंग केल्यास कारवाई होऊ शकते. शाळा, कॉलेजना सुट्ट्या जाहीर केल्यात. विद्यार्थ्यांनी सुट्ट्या म्हणून घराबाहेर पडू नये, असं आवाहन आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे. असाच प्रकार बीडमध्येही घडला. आष्टी तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळला असं व्हाट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या आणि पोस्ट व्हायरल करणाऱ्या दोघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे अशा खोट्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवणाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्यात कोरोनाची संख्या 33 वर पोहोचली आहे. तर पुण्यात कोरोनाचे 16 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचे थैमान! इटलीत 368 तर इरानमध्ये 24 तासांत 113 लोकांचा मृत्यू राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 33 वर जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार पसरला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 105हून अधिक आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 33 वर आहे. वाढत्या संसर्गामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर आरोग्य विभागाकडून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, काळजी घेण्याचं आवाहन वारंवार करण्यात आलं आहे. जगभरात हजारो लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 100हून अधिक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूरमध्ये झाला कोरोना संशयिताचा मृत्यू कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू झाला आहे. संबधित व्यक्ती 15 तारखेला कोरोना संशयित म्हणून सीपीआरमध्ये दाखल झाली होती. सर्व चाचण्या झाल्यानंतर रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून मृत्यूचं नेमकं कारण काय असावं याचा डॉक्टर शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे रक्ताचे नमुने टेस्टिंगसाठी पुण्याला पाठवले होते. आज अहवाल येणार होता. पण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला. खरंतर कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे आजाराची लागण झाल्याच्या धक्क्यामुळे व्यक्तीचा जीव गेला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात येत आहे.
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या