Home /News /pune /

Pune: धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे, कालिचरण महाराज विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

Pune: धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे, कालिचरण महाराज विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रपिता महात्मा गांधी विरोधात गरळ ओकणारा कालिचरण महाराज आता पुरता अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. 

पुणे, 29 डिसेंबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात गरळ ओकणारा कालिचरण महाराजाविरूद्ध (Kalicharan Maharaj) आता पुण्यातही गुन्हा दाखल झालाय. पण वेगळ्या प्रकरणात.. 19 डिसेंबर रोजी पुण्यात हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांनी अफजल खानाचा आनंदोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात प्रक्षोभक भाषा वापरल्यासंबंधीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या गोपनीय अहवालानंतर रात्री उशीरा हा गुन्हा दाखल झाला आहे. (Pune police registered case against Milind Ekbote and Kalicharan Maharaj) मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या जातीय भावना दुखविल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडी संघटक कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांचे बंधू आणि कालिचरण महाराज यांच्यासह सहा जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सोमनाथ ढगे यांनी फिर्याद दिली आहे. वाचा : उधारीवर दारू न दिल्याने सटकली; विक्रेत्यावर दगडाने केला हल्ला, घटनेचा CCTV आला समोर मिलींद रमाकांत एकबोटे (कार्याध्यक्ष - समस्त हिंदू आघाडी संघटना शिवाजी नगर) मोहनराव शेटे, दिपक बाबुलाल नागपुरे (सामाजिक कार्यकर्ता) कालीचरण महाराज (रा. अकोला ) कॅप्टन दिगेंद्रकुमार( रा. राजस्थान) नंदकिशोर रमाकांत एकबोटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही घटना 19 डिसेंबरला नातुबाग मैदान, शुक्रवार पेठ याठिकाणी घडली. घटनेचा व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपची पडताळणी करुन मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समस्त हिंदू आघाडी सघटनेतर्फे 'शिवप्रतापदिन अर्थात अफझलखान वधाचा आनंदोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन 19 डिसेंबरला नातू बागेत करण्यात आले होते. त्यावेळी मिलिंद एकबोटे यांच्यासह सर्व आरोपींनी मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावतील जातील, धार्मीक श्रध्दांचा अपमान करुन दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भडकाऊ वक्तव्ये केली. त्याशिवाय कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपची पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. खडक पोलीस ठाण्यातील गुन्हे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे तपास करीत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Pune

पुढील बातम्या