पुणे 22 एप्रिल: लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. सोशल मीडियावर तर खोट्या बातम्या आणि वाईट शेरेबाजीने धुमाकूळ घातलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पेजवर अश्लील कमेंट करणाऱ्या 6 युवकांना पोलिसांनी दणका दिला आहे. त्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. चाकणकर यांनी सोमवारी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती.
रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी पोष्ट टाकली होती. त्यावर या युवकांनी अश्लील आणि असभ्य भाषेत कमेंट केल्या होत्या. त्यानंतर चाकणकर यांनी सायबर सेलकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी चौकशी करत सहा युवकांविरुद्ध सिंहगड पोलिसांनी ही कारवाई करावी.
लाॅकडाऊनच्या काळात सोशल मीडियाद्वारे खोटी माहिती आणि बनावट पोस्टवर आधारित अफवा पसरवल्या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने तब्बल 183 गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये 176 गुन्हे हे दखलपात्र असून त्यानुसार एफआयआर देखील दाखल करण्यात आले आहे, तर या 183 पैकी 7 गुन्हे हे अदखल पात्र आहेत.
या 183 गुन्ह्यांत 37 जणांना अटक करण्यात आली असून 114 जणांची ओळख पटली आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये 88 जण असे आहेत, ज्यांनी प्रक्षोभक माहिती आणि भाषणे सोशल मीडियाद्वारे केली आहेत. तर 32 पोस्ट या सोशल मीडियवरून डिलीट करण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत सोशल मीडियाचा गैरवापर करण्याची 6 प्रकरणे समोर आली असून त्यानुसार गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. यातील 176 गुन्हे हे दखल पात्र असून त्यानुसार एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. तर या 183 पैकी 7 गुन्हे हे अदखल पात्र आहेत. या 183 गुन्ह्यांत 37 जणांना अटक करण्यात आली असून 114 जणांची ओळख पटली आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर, या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे . महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.