जुन्नर, 3 डिसेंबर: पुणे-नाशिक महामार्गावर तालुक्यातील वर्दळीच्या ठिकाणी नारायणगाव येथील एसटी स्थानकासमोर विश्वनाथ लॉजवर छापा टाकत वेश्या व्यवसाय चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासोबत आळंदी येथील दोन तरुण महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
लॉज चालक अशोक हृदयनारायण तिवारी, गौरव अशोक तिवारी व कैलास नामदेव वाबळे यांच्या मदतीने सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवत होते.
हेही वाचा..राष्ट्रवादीच्या रेखा जरे हत्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, मास्टरमाइंड फरारच
नाारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांना कळवली. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मंदार जवळे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे हजर राहून सदर छापा कारवाईसाठी पोलीस स्टाफ, पंच व बनावट गिराईक यांना योग्य ते मार्गदर्शन करून छापा कारवाईसाठी रवाना केले.
सदर ठिकाणी बनावट गिऱ्हाईक यांनी जाऊन वेश्या व्यवसायासाठी मुलीची मागणी केली. त्याप्रमाणे कैलास वाबळे यांनी वेश्या गमनासाठी महिला पुरवून त्यांचेकडून विश्वनाथ लॉजचे चालक अशोक तिवारी, गौरव तिवारी यांनी एक हजार रुपये रोख रक्कम स्वीकारली. लागलीच माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांनी व पोलीस स्टाफ व पंच यांनी सदर ठिकाणी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणारी पीडित दोन महिला यांना ताब्यात घेऊन लॉजचे चालक अशोक तिवारी , गौरव तिवारी यांना ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा...आताशी कुठे झाली होती नवदाम्पत्याच्या आयुष्याची सुरूवात, क्षुल्लक वादानं केला घात
आरोपी अशोक हृदयनारायण तिवारी, गौरव अशोक तिवारी(रा. विश्वनाथ लॉज नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) व कैलास नामदेव वाबळे ( रा वडगाव सहाणी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्याविरूध्द पोलीस कॉन्स्टेबल योगेश दामोदर गारगोटे यांनी फिर्याद दिली असून पिटा व प्रचलीत कायदयान्वये पुढील अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.