Home /News /pune /

Pune News: पुण्यात गुंडांचा धुडगूस, वाहनांची तोडफोड; CCTV त कैद झालेल्या टोळक्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pune News: पुण्यात गुंडांचा धुडगूस, वाहनांची तोडफोड; CCTV त कैद झालेल्या टोळक्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pune Crime News: वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी गजाआड केलं आहे. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी या टोळक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पुणे, 18 डिसेंबर : पुण्यात (Pune) पुन्हा एकदा गुंडाचा उच्छाद पहायला मिळाला. रात्रीच्या सुमारास धुडगूस घालत वाहनांची तोडफोड (goons vandalised vehicles) करणाऱ्या या टोळीला अवघ्या काही तासांतच पोलिसांनी अटक केली आहे. खुनाचा प्रयत्न करून वाहनांची तोडफोड करणारी दहशत माजवणारी टोळी 12 तासाचे आत बिबवेवाडी पोलिसांनी (Bibavewadi Police) ताब्यात घेऊन गजाआड केली. ही घटना बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याची माहिती समोर आली आहे. काकडे वस्ती येथे राहणारा अमिर खान तसेच शेळकेवस्तीत राहणारा सुरज कोळी आणि अकाश कोळी यांचे एप्रिल 2021 पासून पूर्ववैमनस्यावरून वाद सुरु होते. 13 डिसेंबर रोजी अमिर खानचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करत असताना शेळके वस्तीतील सुरज कोळी आणि त्याचे साथिदार हे अमिर खानला मारण्यासाठी गेले. यावेळी अमिर खान आणि त्याचे मित्र तेथून पळून गेले. त्यानंतर 13 डिसेंबरच्या रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अमिर खान हा त्याचे मित्र हत्यारे घेऊन सुरज कोळी आणि त्याच्या टीमला मारण्यासाठी शेळके वस्तीत शिरले. वाचा : शिकाऊ ग्रामसेवकच निघाला सोनसाखळी चोर, सुट्टीच्या दिवशी करायचा चोरी पण घरे माहिती नसल्यामुळे त्यांनी वस्तीतील लोकांच्या वाहणांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या टोळक्याने 2 ऑटो रिक्षा 4 पेगो, 1 टेम्पो यांच्या काचा कोयत्याने, तलवारीने फोडल्या. तसेच 1 कॅलिबर मोटार सायकल आणि 1 मोपेड गाडीच्याच्या पेट्रोल टाकीवर कोयते, तलवारीने मारून मोठ-मोठ्याने आरडाओरडा करून दहशत माजवली. त्याचप्रमाणे वस्तीत राहणाऱ्या नागरिकांवर सुद्धा त्यांनी हल्ला केला. घडलेल्या प्रकाराची तक्रार तेथील नागरिकांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात केली. रोहित नरसिंग राठोड, अरबाज अहमद पटेल, सुरेंद्र गोपाल लाबीछने, रोहन राजेंद्र जगताप, सोनु अनिल खंदारे, अर्जुन ऊर्फ शैलेश अमोघसिद माळू असे आरोपींची नावे आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होताच बिबवेवाडी पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व आरोपींना 12 तासाच्या आत हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारे टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न या गुंडाकडून वारंवार होताना दिसत आहे. टोळक्यांच्या या उच्छादामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cctv footage, Crime, Pune

पुढील बातम्या