पुणे, 28 जानेवारी: ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतली अण्णा आणि शेवंताची रोमॅन्टिक जोडी छोट्या पडद्यावर हिट ठरली. अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सनं तर अनेकांना भुरळ घातली आहे. त्यांच्यातल्या रोमँटिक सीनवर अनेक मीम्स व्हायरल होत असतात. याच मीम्सचा वापर करत पुण्यात एका होमगार्ड समादेशकानं महिलेचा विनयभंग गेल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. अण्णा आणि शेवंताचे मिठीतले फोटो पाठवून महिलेचा विनयभंग करणाऱ्या होमगार्डच्या हातात विश्रांतवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
पुण्यात राहाणारी एका 28 वर्षीय महिलेनं होमगार्ड समादेशकाविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय. पीडित महिला होमगार्ड म्हणून कार्यरत होती. तर आरोपी उत्तम साळवी हा शहर समादेशक म्हणून काम करतो. मार्च 2019 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान आरोपी साळवी वारंवार पीडित महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवून जवळीक वाढविण्याचा प्रयत्न करत होता.
याच दरम्यान त्यानं लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले' मधील अण्णा आणि शेवंताने एकमेकांना मारलेल्या मिठीचे फोटो मोबाईवरुन पीडित महिलेला पाठवले. याच्या खाली ‘प्रेमाला वय नसतं’ असा मेसेजही पाठवला. तसंच पीडित महिला कार्यालयात काम करत असताना आरोपी तिच्याकडे वाईट नजरेनं वारंवार पाहात होता. शिवाय विरोध केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असल्याचंही पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
सातत्यानं सुरु असलेल्या या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी उत्तम साळवीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल होताच विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी उत्तम साळवीला बेड्या ठोकल्यात. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते करत आहेत.
'या सगळ्यामागे सरोज खान', गणेश आचार्यनं नाकारले महिला कोरिओग्राफरचे आरोप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Molestation Case, Pune, Ratris khel chale