S M L

अल्पवयीन तरुणीचं अपहरण प्रकरण पुणे पोलिसांना पडलं महागात

आपल्या मुलीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पुणे पोलिसांकडून काही प्रयत्न होत नसल्याचे पाहून मुलीच्या कुटुंबाने अखेर 14 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Renuka Dhaybar | Updated On: May 25, 2018 11:47 AM IST

अल्पवयीन तरुणीचं अपहरण प्रकरण पुणे पोलिसांना पडलं महागात

पुणे, ता. 25 मे : अल्पवयीन तरुणीचं अपहरण प्रकरण पुणे पोलिसांना चांगलंच महागात पडलं आहे. आपल्या मुलीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पुणे पोलिसांकडून काही प्रयत्न होत नसल्याचे पाहून मुलीच्या कुटुंबाने अखेर 14 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी आज हायकोर्टानं थेट पुण्याचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिलेत.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देऊनही तपास अधिकारी हजर राहिले नव्हते, याची अत्यंत गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेत. लालबिगे यांच्या मुलाला अपहृत मुलीच्याच मोबाईलवरून फोन आला आणि एका तरुणाने मुलीच्या भावाला मोबाईलवरून धमकी दिली. यासंदर्भात लालबिगे कुटुंबीयांनी पोलिसांत एफआयआर नोंदवला.

मात्र, पोलिसांनी एफआयआरमध्ये मुलीच्या अपहरणाची तारीख चुकीची नोंदवली आणि मुलीचे त्या मुलाशी प्रेमसंबंध होते, अशी नोंद केली. असा लालबिगे कुटुंबीयांचा आरोप आहे. या प्रकरणाची गंभीर दखत घेत, पुणे पोलिस आयुक्तांना आज हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2018 11:47 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close