S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

पुणे पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांची दुरवस्था, तर अधिकाऱ्यासाठी लाखाचा बंगला

पुण्याचे दक्षिण विभागाचे अपार आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने तब्बल एक लाख रुपये भाड्याने खाजगी बांगला कोथरूडमध्ये भाड्याने घेतलाय.

Sonali Deshpande | Updated On: Jan 5, 2018 01:42 PM IST

पुणे पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांची दुरवस्था, तर अधिकाऱ्यासाठी लाखाचा बंगला

वैभव सोनवणे, 05 जानेवारी : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका अधिकाऱ्याच्या कार्यालयासाठी खाजगी बांगला तब्बल एक लाख रुपये भाड्याने घेण्यात आलाय. पुण्याचे दक्षिण विभागाचे अपार आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने तब्बल एक लाख रुपये भाड्याने खाजगी बांगला कोथरूडमध्ये भाड्याने घेतलाय. त्यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांना बसायला पोलीस स्टेशन मध्ये नीट जागा नाही आणि अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी मात्र खाजगी बंगला भाड्याने घेण्यात आलाय .

हे आहेत पुणे पोलिसांचे दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर  आणि हे त्यांचे आलिशान कार्यालय. सेनगावकर साहेबांचं हे कार्यालय कुठल्या सरकारी ,निमसरकारी किंवा महापालिकेच्या इमारतीत नाही, तर हे कार्यालय आहे कोथरूडच्या आलिशान सोसायटीत तब्बल एक लाख रुपये महिना भाड्याने घेतलेल्या बंगल्यात.  ते कार्यालय त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पदाला साजेसं नव्हतं आणि काम करण्यासाठीच्या वातावरणाला पोषक  नव्हतं  म्हणून हा बंगला भाड्याने घेऊन हे पॉश कार्यालय तयार करण्यात आलंय.

सेनगांवकरांना ज्या इमारतीत काम करण्यासाठी पोषक वातावरण नाही असं वाटत त्याच फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस स्टेशन आणि झोन एकचं उपायुक्त कार्यालयही आहे. पण कार्यलयात काम करायला पोषक वातावरण असावं हे मान्य जरी केलं तरी कोथरूड परिसरात पुणे महापालिकेच्या अनेक मालमत्ता आहेत जिथे हे कार्यालय उभं करता आलं असतं.साहेबी थाटापुढे कुणाची मर्जी चालत नाही असाच पुणे पोलीस आयुक्तालयातला कारभार सध्या पाहायला मिळतोय. आणि त्याचीच जोरदार चर्चा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2018 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close