पुणे, 14 फेब्रुवारी: जगभरात Valentine day मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अगदी सोशल मीडियापासून ते राजकारणापर्यंत सर्व स्तरावर ह्या दिवसाचा उत्साह काही वेगळाच असतो. यंदा या सगळ्यात पुणे पोलीसही मागे राहिले नाहीत. त्यांनीही खास तरुणांसाठी उपक्रम आणि मोहीम केल्या आहेत. Valentine day निमित्तानं पुणे पोलिसांनी खास चाय डेटचं आयोजन केलं आहे. यंदा संपूर्ण Valentine weekमध्ये पुणे पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमामुळे सोशल मीडियावर खास चर्चेचा विषय झाले आहेत. पुणे पोलिसांनी चाय डेट विथ पुणे पोलीस असा खास आज उपक्रम राबवला आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी दुपारी 3 पर्यंत आपली नावं आणि कन्फर्मेशन पुणे पोलिसांना द्यायचं आहे. संध्याकाळी 5 वाजता पुणे पोलीस ठाण्यात चाय डेटसाठी यायचं आहे. यासाठी कोणतंही वयाचं बंधन नाही.
चंदन देसाई नावाच्या तरुणाने ट्वीटरवर एक प्रश्न विचारला होता. तुम्ही मला व्हॅलेंटाइन डेला डेटवर नेणार का? माझं कोणी व्हॅलेंटाइन नाही तर मला तुम्ही डेट वर घेऊन जाल ही माझी शेवटची इच्छा आहे. त्यावर पुणे पोलिसांनी भन्नाट उत्तर दिलं आहे. पुणे पोलिसांनी खास चाय डेटचं आयोजन केलं आहे. इच्छुकांनी पोलीस ठाण्याच चाय डेटसाठी येण्याचं आवाहन पुणे पोलिसांकडून कऱण्यात आलं आहे.
याआधी पुणे पोलिसांनी 8 फेब्रुवारीला टेडी आणि Rose Dayच्या निमित्तानं एका तरुणाला खास गिफ्ट दिलं . हे गिफ्ट त्या तरुणाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.महाराष्ट्रभरात हेल्मेट सक्ती असून प्रत्येक दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. जी व्यक्ती हेल्मेट घालत नाही त्याला दंड भरावा लागतो. असंच पुण्यातील एका तरुणाला विनाहेल्मेट पकडल्यानंतर घडलेली घटना खूपच रंजक आहे. या तरुणाने हेल्मेट घातले नव्हते. पुणे पोलिसांनी याला पकडल्यानंतर या तरुणाने हेल्मेट घालू न शकल्याचे कारण सांगितले.