मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

'सुहास पाटील'ने विचारलं- मी बाहेर पडलो तर? पुणे पोलिसांचं सडेतोड उत्तर

'सुहास पाटील'ने विचारलं- मी बाहेर पडलो तर? पुणे पोलिसांचं सडेतोड उत्तर

Mumbai: Police stop a scooterist while enforcing the complete lockdown imposed to contain the coronavirus pandemic, near Vashi in Mumbai, Tuesday, March 31, 2020. (PTI Photo/Kunal Patil) (PTI31-03-2020_000068B)

Mumbai: Police stop a scooterist while enforcing the complete lockdown imposed to contain the coronavirus pandemic, near Vashi in Mumbai, Tuesday, March 31, 2020. (PTI Photo/Kunal Patil) (PTI31-03-2020_000068B)

एका महाशयांनी पुणे पोलिसांना ट्विटरवर टॅग करत विचारलं की, 'जर मी बाहेर पडलो तर...?' पुणे पोलिसांनी आगाऊपणा करणाऱ्या या तरूणाला दिलेलं उत्तर एकदम भन्नाट आहे.

    पुणे, 13 एप्रिल : सध्या देशभरातील पोलीस त्यांच्या ट्विटरवरून समाजामध्ये कोरोनाविषयी (Coronavirus) जनजागृती करत आहेत. काहींना समस्या आहेत त्या देखील सोडवण्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरच्या ट्रोलर्सना देखील पोलीस चोख उत्तर द्यायला मागेपुढे बघत नाही आहे. पुणे पोलिसांचं असच एक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महाशयांनी पुणे पोलिसांना ट्विटरवर टॅग करत विचारलं की, 'जर मी बाहेर पडलो तर...?' पुणे पोलिसांनी आगाऊपणा करणाऱ्या या तरूणाला दिलेलं उत्तर एकदम भन्नाट आहे. (हे वाचा-25 हजार कामगारांना मदत केल्यानंतर मालेगावच्या महिलांसाठी सलमान ठरला देवदूत) पोलिसांनी अगदी सहजपणे या ट्विटर युजरला प्रश्न विचारले आहेत की, 'जर आम्ही तुम्हाला आतमध्ये टाकलं तर? आम्ही तुम्हाला उगाचच आतमध्ये टाकलं तर योग्य होईल का? मग विनाकारण बाहेर पडणं योग्य कसं?'. असे काही उलटप्रश्न पोलिसांनी या ट्विटर युजरला विचारले आहेत सुहास पाटील असं या ट्विटर युजरचे नाव आहे. दरम्यान पुणे पोलिसांचे हे ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट्स करत पुणे पोलिसांच्या उत्तराचं कौतुक केले आहे. हजारहून जास्त लोकांनी हे ट्वीट लाइक केलं आहे तर अनेकांनी रिट्वीट देखील केले आहे. पोलिसांच्या या भन्नाट उत्तराने या तरूणाची बोलती बंद झाली असणार एवढं मात्र नक्की. संपादन- जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Pune police

    पुढील बातम्या