मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune News: पुणे पोलिसांनी वर्दीवरील डाग पुसला, दीड महिन्यांनंतर 'त्या' चोरट्यांना अखेर अटक

Pune News: पुणे पोलिसांनी वर्दीवरील डाग पुसला, दीड महिन्यांनंतर 'त्या' चोरट्यांना अखेर अटक

या घटनेमुळे पोलीस पळपुटे आहेत, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती.

या घटनेमुळे पोलीस पळपुटे आहेत, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती.

या घटनेमुळे पोलीस पळपुटे आहेत, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती.

पुणे, 8 फेब्रुवारी : पुण्यात औंध भागातील सोसायटीमध्ये ज्या चोरट्यांना पाहून पोलिसांनी पोबारा केला होता, त्याच चोरट्यांच्या मुसक्या गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. मुळात हे चोरटेच पोलिसांना घाबरले होते, म्हणून त्यांनी आरडाओरडा केला होता. पण या गोंधळात चोरट्यांना घाबरून पोलिसांनाच पळ काढला. 28 डिसेंबरला चतुरशृंगी हद्दीत घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.

या घटनेमुळे पोलीस पळपुटे आहेत, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. यातील दुर्दैवाची बाब म्हणजे एक पोलीस कर्मचारी आपल्या सहकाऱ्याला तिथे सोडून भीतीपोटी पळून गेला होता. या सगळ्या प्रकारानंतर 'न्यूज18 लोकमत'ने दाखवलेल्या बातमीमुळे पोलीस आयुक्तांनी तातडीने या दोन्ही कर्मचाऱ्यांची चौकशी लावून त्यांना निलंबित केलं होतं. मात्र घडलेल्या घटनेमुळे पुणे पोलिसांची राज्यभर नाचक्की झाली होती. अगदी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील पोलिसांवर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या चोरट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर होतं.

हेही वाचा - पिंपरीतील बेपत्ता असलेल्या व्यावसायिकाची अपहरणानंतर हत्या; महाडमध्ये आढळला मृतदेह

गेले महिनाभर पुणे पोलिसांची गुन्हे शाखा या आरोपींच्या मागावर होती. त्यातील एका आरोपीला 15 दिवसांपूर्वी वानवडी परिसरात पाठलाग करून पकडण्यात आलं होतं. अखेर त्या चौघांपैकी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बिरजू सिंग दुधानी, सनी सिंग दुधानी यांना आत्ता तर आधी बिंतु सिंग कल्याणी असे तिघे अटकेत आहेत. हे चारही आरोपी अत्यंत सराईत गुन्हेगार असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये घरफोडीचे या चौघांनी मिळून 100 पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

सराईत असलेल्या गुन्हेगारांनी पुणे पोलिसांना थेट आव्हानच दिलं होतं. अखेर चारपैकी तीन जणांना पकडण्यामध्ये पुणे पोलिसांना यश आलं आहे. चौथा मात्र अद्यापही फरार आहे. आता अटक करण्यात आलेल्या दोघांवर एकूण 77 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास 15 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, सोबतच घरफोड्यांचे 11 गुन्हे उघडकीला आणले आहेत.

First published:

Tags: Pune (City/Town/Village), Pune crime news, Pune police