मानलं गड्यांनो! काळजाला भिडणारा पुणे पोलिसांचा VIDEO, पाहुन डोळ्यांना लागतील धारा

मानलं गड्यांनो! काळजाला भिडणारा पुणे पोलिसांचा VIDEO, पाहुन डोळ्यांना लागतील धारा

घरात गेल्यानंतर पोलीस जवानाच्या मुली त्याचं स्वागत करतात. मात्र त्याची बायको चिंताग्रस्त असते.

  • Share this:

पुणे 5 जून: कोरोना व्हायरस विरुद्ध सगळ्यांनीच युद्ध छेडलं आहे. यात आघाडीवर आहेत ते डॉक्टर्स आणि पोलीस. डॉक्टर्स दवाखाण्यात पेशंट्सचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर पोलीस नागरिकांचे प्राण वाचावेत यासाठी आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करत आहेत. आत्तापर्यंत राज्यातल्या हजारांपेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाने ग्रासलंय. तर अनेकांचा मृत्यू झाला. मात्र पोलीस आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. पोलिसांचं मनोधैर्य दाखविणारा असा एक VIDEO पुणे पोलिसांनी तयार केला असून तो काळजाला भिडणारा आहे.

सलग तीन दिवस काम करून एक पोलीस आपल्या घरी परततो. तीन दिवसांमध्ये त्याला क्षणभरही झोप मिळालेली नसते. घरात गेल्यानंतर पोलीस जवानाच्या मुली त्याचं स्वागत करतात. मात्र त्याची बायको चिंताग्रस्त असते.

तो बोलत जातो मात्र ती काहीच बोलत नाही. तो जेव्हा चहा पितांना तिच्याकडे बघतो त्यावेळी तिच्या डोळ्यांना धारा लागलेल्या असतात. ती म्हणते, शेजारच्या शिंदेंना कोरोना झाला, मात्र शिंदे काकुंना कुणीही भेटायला गेलं नाही. माणुसकीच राहिली नाही. मला तुमची काळजी वाटते. तुम्हाला काही झालं तर? त्यावर त्या जवानाने दिलेलं उत्तर पोलिसांची हिंम्मत दाखविणारं आहे. तो म्हणतो, मी आणि माझ्यासारख्या अनेकांनी लोकांच्या रक्षणाची शपथ घेतलीय. त्यांना वाऱ्यावर सोडून मी घरी राहू शकत नाही. आणि कोरोना हा बरा होणारा आजार आहे. अनेक जण त्यातून बरे झाले आहेत.

त्यामुळे आपण गावाकडे जाण्याचा विचार न करता शिंदे काकुंना भेटायला जावू. यातून पुणे पोलिसांनी जन जागृती करत सगळ्या समाजालाच योग्य संदेश दिला आहे.

First published: June 5, 2020, 9:52 PM IST

ताज्या बातम्या