मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे पोलीस आयुक्तांचा धक्कादायक VIDEO : पूजा चव्हाण प्रकरणाविषयी विचारताच हसले आणि...

पुणे पोलीस आयुक्तांचा धक्कादायक VIDEO : पूजा चव्हाण प्रकरणाविषयी विचारताच हसले आणि...

Pune Police Commissioner Video : इतक्या गंभीर प्रकरणात पुणे पोलिसांची हीच संवेदनशीलता आहे का, असा प्रश्न पोलीस आयुक्तांच्या प्रतिक्रियेमुळे निर्माण झाला आहे.

Pune Police Commissioner Video : इतक्या गंभीर प्रकरणात पुणे पोलिसांची हीच संवेदनशीलता आहे का, असा प्रश्न पोलीस आयुक्तांच्या प्रतिक्रियेमुळे निर्माण झाला आहे.

Pune Police Commissioner Video : इतक्या गंभीर प्रकरणात पुणे पोलिसांची हीच संवेदनशीलता आहे का, असा प्रश्न पोलीस आयुक्तांच्या प्रतिक्रियेमुळे निर्माण झाला आहे.

पुणे, 2 मार्च : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये (Pooja Chavan Suicide Case) सुरुवातीपासूनच पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. सातत्याने या प्रकरणाच्या तपासात काय झालं, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतरत पुणे पोलिसांकडून केवळ तपास सुरू आहे इतकंच उत्तर मिळतं. त्यातच आता पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा एक धक्कादायक व्हिडिओ (Pune Police Commissioner Video) समोर आला आहे.

यवतमाळ, बीड याठिकाणी तपासासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकांनी नेमकी कोणाची चौकशी केली, कोणाचे जबाब नोंदवले, याबाबत 20 दिवसांनंतरही पुणे पोलीस कुठलाही खुलासा करत नसल्याचं दिसत आहे.

ससून रुग्णालयाकडून पूजा चव्हाण हिच्या मृत्यूचा सविस्तर पोस्टमार्टम रिपोर्ट आज देण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूचे कारण हे गंभीर दुखापत असल्याचे सांगण्यात आले. यासोबतच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पूजा हिच्या गर्भपातासंदर्भातली नेमकी काय माहिती आहे, याबाबत आज पुणे पोलीस आयुक्तांकडे पत्रकार परिषदेत विचारणा केल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त हसत-हसत उठून गेले.

हेही वाचा - Pooja Chavan Death Case: प्रकरण दडपण्यासाठी 5 कोटींच आमिष दिल्याचा पूजाच्या चुलत आजीचा गौप्यस्फोट

इतक्या गंभीर प्रकरणात पुणे पोलिसांची हीच संवेदनशीलता आहे का, असा प्रश्न पोलीस आयुक्तांच्या प्रतिक्रियेमुळे निर्माण झाला आहे. मिलिटरी इंटेलिजन्स सोबतीनं भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर या प्रकरणात पुणे पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. त्याच्या पत्रकार परिषदेसाठी पोलीस आयुक्त आले होते. मात्र पत्रकार परिषदेच्या मध्यावर आयुक्तांना पूजा चव्हाण प्रकरणातील पोस्टमोर्टमवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देण्याऐवजी आयुक्तांनी माध्यमांकडे हसत हसत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. त्यामुळे ज्या प्रकरणात एका मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आला आहे, त्या प्रकरणी पोलीस आयुक्तांची अशी असंवेदनशीलता चर्चेचा विषय ठरली आहे.

गेले 20 दिवस पुणे पोलीस पूजा चव्हाण प्रकरणात सातत्याने टीकेचा विषय ठरत आहेत. मात्र तरीही या प्रकरणाविषयी पुणे पोलिसांचं गांभीर्य खरंच नाही की ते दबावाला बळी पडत आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. पूजा चव्हाण प्रकरण राज्यभर गाजत असताना पुणे पोलिसांच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टनंतर गर्भपातासंदर्भातल्या नोंदी महत्त्वाच्या ठरणार आहेत. मात्र या नोंदींबाबत विचारलेल्या प्रश्नांना नंतर आयुक्तांनी पत्रकार परिषदेतूच काढता पाय घेतला.

First published:

Tags: Pune news, Pune police