Home /News /pune /

पुण्याच्या त्या भीषण अपघाताचा VIDEO VIRAL; आयुक्तांनी उघड केलं अपघाताचं कारण

पुण्याच्या त्या भीषण अपघाताचा VIDEO VIRAL; आयुक्तांनी उघड केलं अपघाताचं कारण

या अपघाताचा VIDEO ट्वीट करत पोलीस आयुक्तांनीच ‘आता नाही तर, मग केव्हा?’ असा सवाल केला आहे. त्याचबरोबर पुण्याच्या अपघाताची धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे.

    पुणे, 04 फेब्रुवारी : पुण्याच्या टिळक रस्त्यावर रविवारी झालेल्या भीषण अपघाताचा CCTV VIDEO चांगलाच व्हायरल झाला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात वेगवान दुचाकीस्वार बसखाली आला. दुचाकीचा भीषण व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. या अपघाताने खळबळ उडाली होती. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. याचा  VIDEO पुणे पोलीस आयुक्तांनी Twitter वर शेअर करत आता पुणेकरांना प्रश्न विचारला आहे. ‘आता नाही तर, मग केव्हा?’  पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी  हा सवाल उपस्थित केला आहे.  या अपघातामागचं कारण भरधाव वेग आणि नियमाचं पालन न करणं असल्याचं पोलिसांच्या ट्वीटवरून दिसतं. भरधाव वेगाने गाड्या चालवणाऱ्यांना आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या चालकांना त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. त्याचबरोबर एका जानेवारी महिन्यात पुण्यात अशा जीवघेण्या अपघातांमध्ये 20 जणांनी प्राण गमावल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. टिळक रस्त्यावर आकाश विधाते या 24 वर्षीय दुग्धव्यावसायिक तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. वेगाने फरफटत येत असलेला दुचाकीस्वार बसच्या समोरच्या भागाखाली जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं. अंगावर शहारे आणणाऱ्या अपघातामध्ये आकाशचा मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वार वेगाने समोरून फरफटत येताना पाहून वेगवान बस थांबली, पण तोवर दुचाकी बसच्या मधल्या भागात अडकल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. रविवारी दुपारी हा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत अपघातग्रस्त तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी या अपघाताविषयी ट्वीट करताना त्याची स्पोर्ट्स बाइक 900 CC ची असल्याचं म्हटलंय. दुचाकीचा वेग अधिक होता. गाडी चुकीच्या बाजूने चालवली जात होती आणि हेल्मेटही घालण्यात आलं नव्हतं; अशी माहिती दिली आहे. पुणेकरांचा हेल्मेटसक्तीला असलेला विरोध लक्षात घेत आयुक्तांनी हे Tweet केलं आहे. आता नाही तर, मग कधी? असा सवालही उपस्थित केला. पोलीस आयुक्तांच्या ट्विटला 376 युजर्सने रिट्विट केलं आहे. असा झाला अपघात रविवारी दुपारी बारा वाजता हा टिळक रस्त्यावर हा भीषण अपघात घडला होता. आकाश स्पोर्ट्स बाईकवरून स्वारगेटच्या दिशेने जात होता. यावेळी त्याचा अपघात  झाला. बसच्या आधी रिक्षाला धडकला लागला होता. रिक्षाला धडकल्याने  त्याचा तोल गेला आणि तो फरफटत समोरून येणाऱ्या बसखाली जाऊन अडकला. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण त्याचा जीव वाचू शकला नाही.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Accident, Pune

    पुढील बातम्या