जे काम 100 वर्षात कुणालाच जमलं नाही ते Lokdownने केलं, पोलीस-पारध्यांचं नातं निर्माण झालं!

जे काम 100 वर्षात कुणालाच जमलं नाही ते Lokdownने केलं, पोलीस-पारध्यांचं नातं निर्माण झालं!

'पोलीस आणि पारधी यांच्यातील चोर, दरोडेखोर नावाची कलंकीत दरी कमी करुन पोलीस आणि पारधी यांच्यात एक मैत्रीचे नाते तयार करण्यात यश आलं'

  • Share this:

पुणे 02 मे : एरवी गावोगावच्या पारधी समाजाच्या वस्तीवर पोलीस गाडी दिसली तरी सगळीकडे नुसती पळापळ सुरू होते. कारण अर्थातच चोरीच्या संशयातून पोलीस धरून नेण्याची भीती. पण या कोरोना लॉकडाऊननं सगळं चित्रच बदलून टाकलं. पुणे जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांवरचे पारधी बांधव उपाशी मरू नयेत म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांनी थेट पालावर जाऊन पारधी बांधवांना किमान महिन्याभराचं राशन वाटप केलं. त्यामुळे कायम ऐकमेकांकडे संशयाने पाहणाऱ्या पोलीस आणि पारधी समाजात एक वेगळं नातं तयार झालं असून ते कायम राहिलं तर खूप मोठा सामाजिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील तब्बल 3 हजार पारधी कुटूंबियांना हे राशन वाटप करण्यात आलं. पारधी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले यांच्या माध्यमातून पोलिसांनी या मदतीचं वाटप केलं. लॉकडाऊनमधल्या पोलिसांच्या या मदतीमुळे पारधी समाजालाही सुखद धक्का बसला आहे. त्यामुळे ते भारावून गेले आहेत. ब्रिटीश काळापासून रानोमाळी पालं ठोकून राहणाऱ्या या पारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारला गेल्याने कुठेही चोरी झाली की पोलीस पहिले यांना उचलून तुरूंगात टाकतात असा आरोप होतोय.

पण आता लॉकडाऊनच्या निमित्ताने चक्क पोलीसच त्यांची समाजाची काळजी घेत असल्याने पारधी समाजामध्येही पोलिस खात्याच्या प्रती एक विश्वासाचं नातं निर्माण होताना दिसतं आहे. हे नातं कायम राहिलं आणि कायम आक्रमक असणाऱ्या पारधी तरुणांनीही दोन पावलं पुढं टाकली तर गेल्या 100 वर्षांपासून सुरू असलेला एक संघर्ष संपण्याची ही सुरुवात मानली जात आहे. पुणे पोलिसांच्या या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी पारधी वस्तीवरच्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

...तर मोठी किंमत चुकवावी लागेल, शिवसेना खासदारांचा थेट मोदी सरकारला इशारा

सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले म्हणाले, 80वर्षानी लाल दिवा पारधी पाड्यावर सन्मानाने उभा राहीला आणि आनंदाचे वारे वाहुन गेले,

ज्या लाल दिव्याने कोस दुर पळवले आज त्या लाल दिव्यानेच दोन घास भरवले, गेले एक महिन्यापासुन पुण्याचे पोलिस अधीक्षक संदिप पाटिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण  पुणे जिल्हातील अनेक भागात शेकडो गरीब कुटूंबाला धान्य व बाजार पाटप करत यश आले आहे पण ही मदत पारधी वस्तीवर कधी येईल असं वाटलं नव्हतं.

अशातच आज लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गरीब आदिवासी पारधी कुटूंबाला त्यांच्या घरी जाऊन त्याच्याशी मनमोकळेपणे चर्चा करुन त्यांचे दुःख समजाऊन घेत पोलीस निरीक्षक  मानकर यांनी स्वत: वस्तीवर येत लोकांना साहित्याचं वाटप केलं.  हे राशन एक महिना पुरेल एवढं आहे.या वेळी काही वृद्ध महिलांच्या डोळ्यात आनंदाचे आश्रु वाहीले, त्या म्हणाल्या, साहेब तुमच्यामुळे व नामदेव भाऊ यांच्या प्रयत्नांमुळे मिळाले पंचपकवानाचे जेवन आता महिनाभर कसलीच काळजी नाही. साहेब आमच्या घरी दिवाळीच साजरी झाली.

मुंबई-पुण्यातून गावी जाण्याच्या तयारीत असणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा

आज आमच्यासाठी तुम्ही खाकिवर्दितील देवताच आहात. आज आमच्या मनातली भीतीची दरी कमी झाली साहेब तुम्ही कधी इकडे आले की, बिनधास्त आमच्या पारधी वाड्यावर यायच आणि आजच्या गत आनंदाने चहा पिऊन जायचा. आज पासुन पाच महिने तुम्हाला असाच एवढा बाजार घरपोच देण्यात येईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं आहे.

 

 

 

First published: May 2, 2020, 4:09 PM IST

ताज्या बातम्या