Elec-widget

थरार...दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याची पोलिसांनी केली 6 तासांत सुटका

थरार...दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याची पोलिसांनी केली 6 तासांत सुटका

अपहरणकर्त्यांनी पोलिसांना माहिती सांगितल्यास गणात्रा यांना ठार मारण्याची धमकी दिली. आणि खंडणीची रक्कम घेऊन चांदणी चौकात घेऊन येण्यास सांगितले.

  • Share this:

वैभव सोनावणे, पुणे 15 नोव्हेंबर : झटपट श्रीमंत होण्यासाठी मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्याचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी सहा तासात अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी आरोपीकडून दीड कोटीची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर गाडी आणि दुचाकी असा 1 कोटी 75 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. अजय बाळासाहेब साबळे (वय-24), सुजित किरण गुजर (वय-24), ओंकार श्रीनाथ वाल्हेकर (वय-20) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अजय साबळे हा मुख्य सूत्रधार आहे. तर याच गुन्ह्यातील अमीत पोपट जगताप (वय-20) हा फरार आहे. त्यांनी कांतीलाल गणात्रा (वय-65 रा. सिटी पार्क सोसायटी, मार्केट यार्ड) या व्यापाऱ्याचे अपहरण केले होते.

सत्तास्थापना सध्याच शक्य नाही, वेळ लागणार, शरद पवारांचं सगळ्यात मोठं विधान

सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांतीलाल गणात्रा हे गुरुवारी रात्री घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचे फॉच्युनर कारमधून अपहरण केले. प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका नागरिकाने घटनेची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला दिली. या माहितीच्या आधारे मार्केटयार्ड पोलिसांनी गणात्रा यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्याच दरम्यान आरोपींनी कांतीलाल गणात्रा यांच्या मोबाईलवरून मुलाला फोन करुन दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच पोलिसांना माहिती सांगितल्यास गणात्रा यांना ठार मारण्याची धमकी दिली. आणि खंडणीची रक्कम घेऊन चांदणी चौकात घेऊन येण्यास सांगितले.

EXCLUSIVE: नवी कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट

त्यानंतर पोलिसांनी चांदणी चौकात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी पैसे स्वीकारताना सुजीत गुजर आणि ओंकार वाल्हेकर या दोघांना अटक केली मात्र मुख्यसुत्रधार अजय साबळे आणि अमित जगताप हे खंडणी देण्यासाठी आणलेली दीड कोटीची रक्कम घेऊन फॉच्युनर गाडीतून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली आणि

Loading...

शोध घेऊन अजय साबळे याला अटक केली. आरोपींनी पैसे मिळाल्याची खात्री झाल्यानंतर कांतीलाल गणात्रा यांना खेड शिवापूर येथील शिंदेवाडी येथे सोडून दिले. आरोपींकडे चौकशी सुरु असून त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का ? याचा तपास पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pune crime
First Published: Nov 16, 2019 08:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...