पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, घरातून जप्त केल्या इलेक्ट्रिक गन, डेटोनेटर्स

इलेक्ट्रिक गन, पाईप बॉम्ब बनवण्याचं साहित्य, तलवार, कोयता, भाले, 59 डेटोनेटर्स, गनपावडर त्याचप्रमाणे स्फोटकांचा मोठा साठा या घरातून जप्त करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 12:42 PM IST

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, घरातून जप्त केल्या इलेक्ट्रिक गन, डेटोनेटर्स

पुणे, 03 एप्रिल : पुण्याच्या जुन्नरमध्ये ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राजाराम अभंग नामक व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक गन, पाईप बॉम्ब बनवण्याचं साहित्य, तलवार, कोयता, भाले, 59 डेटोनेटर्स, गनपावडर त्याचप्रमाणे स्फोटकांचा मोठा साठा या घरातून जप्त करण्यात आला आहे.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे पुण्यात एका घरात हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजाराम अभंग नामक व्यक्तीच्या घरात शस्त्रसाठा असल्याचा संशय जुन्नर पोलिसांना आला. त्यानंतर सापळा रचत पोलिसांनी घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका व्यक्तीसह हल्ल्यासाठी वापरण्यात येणारा शस्त्रसाठा जप्त केला.

दरम्यान, या प्रकरणात पोलीस आता ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची कसून चौकशी करत आहे. त्यामुळे हा शस्त्रसाठा नेमका कुठे पुरवला जायचा? व्यक्तीचा कोणाशी संबंध होता? महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा काही प्लॅन होता का ? या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी जुन्नर पोलीस अधिक तपास करत आहेत.Loading...या सगळ्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. पण यावर घाबरून न जाता कुठलीही संशयास्पद वस्तू किंवा प्रकार आढळल्यास त्याची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी असा आव्हान जुन्नर पोलिसांकडून देण्यात आली आहे.


VIDEO : रावसाहेब दानवे पुन्हा चुकले! विंग कमांडर अभिनंदनबद्दल केलं 'हे' वक्तव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...