मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune : संतोष जगताप खून प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी केली धडक कारवाई

Pune : संतोष जगताप खून प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी केली धडक कारवाई

संतोष जगताप खून प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

संतोष जगताप खून प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

संतोष जगताप खून प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

पुणे, 24 ऑक्टोबर :  पुणे (pune) जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये (lonikalbhor) दोन दिवसांपूर्वी भर दिवसा दोन गँगमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत संतोष जगताप याचा ( Santosh Jagtap murder case ) खून झाला होता. या प्रकरणी अखेर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

संतोष जगताप खून प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली होती. कुख्यात गुन्हेगार संतोष जगताप याचा खून करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. पवन महादेव मिसाळ आणि महादेव अडलिंगे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे.

घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. या दोन्ही आरोपींनी संतोष जगतापवर गोळीबार केल्याचं कबूल केलं आहे. एकूण 5 जणांनी संतोष जगतापवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी 22 ऑक्टोबर रोजी लोणीकाळभोर परिसरातील उरूळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारात संतोष जगताप याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हॉटेल सोनईसमोर ही घटना घडली.

संतोष जगताप हा वाळू व्यावसायिक होता. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनईसमोरून जात असताना. त्याचवेळी तिथे पाच जणांनी संतोष जगताप याच्यावर हल्ला चढवला. या हल्लोखोरांनी तीक्ष्ण हत्यारासह हल्ला चढवत गोळीबार केला. यात संतोष जगताप हा गंभीर जखमी झाला. तर त्याचे अंगरक्षकही जखमी झाले. पण जखमी अवस्थेत संतोष जगतापने हल्लेखोरांवर प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर ठार झाला तर बाकीचे हल्लेखोर पळून गेले आहे.

संतोष जगताप आणि त्याच्या जखमी अंगरक्षकांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वी संतोष जगताप यांचा मृत्यू झाला होता.अप्पा लोंढे गँग आणि त्याच्या विरूद्ध असलेल्या एका टोळीमध्ये ही फायरिंग झाल्याची माहिती समोर आली. वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युद्ध भडकले होते. या गँगवॉरमध्ये अप्पा लोंढे टोळीतील संतोष जगताप त्याच्यासोबत अजून दोघे होते. हा सर्व प्रकार त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झाला.

Pune Job Alert: कृषी विभाग पुणे इथे 1,75,000 रुपये कमावण्याची संधी

संतोष जगताप याची सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. राहू येथे बेकायदा वाळू उपश्यावरुन २०११ मध्ये तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत बंधू रमेश सोनवणे यांच्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप याच्यावर होता. या प्रकरणी जामिनावर संतोष जगताप बाहेर होता. त्यानंतर आता संतोष जगताप यांची सुद्धा भरदिवसा गोळीबार करून हत्या करण्यात आली.

First published: