Home /News /pune /

पत्नीला भेटायला आला अन् गजाआड पोहोचला; पुण्यातील सराईत गुन्हेगार अटकेत

पत्नीला भेटायला आला अन् गजाआड पोहोचला; पुण्यातील सराईत गुन्हेगार अटकेत

Crime in Pune: पुण्यातील विविध भागात गंभीर गुन्हे करून पोलिसांना गुंगारा देण्याऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

    पुणे, 30 जुलै: ऐन वटपोर्णिमेच्या दिवशी वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून (Snatch gold chain) पोबारा करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या (Thief Arrest) आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं आतापर्यंत शहरात दहा गुन्हे केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी आरोपीकडून 7 लाख 6 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यासोबत गुन्ह्यांत वापरलेली चोरीची दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. असद ऊर्फ असदुल्ला माशाअल्ला जाफरी ऊर्फ इराणी असं अटक केलेल्या 47 वर्षीय सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. आरोपीनं 2019 पासून अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपी फरार होता. पण यावेळी आपल्या बायकोला भेटायला आल्यानंतर (Came to meet wife) तो  पोलिसांच्या कचाट्यात सापडला (Got arrested) आहे. आरोपी जाफरी आपल्या बायकोला भेटायला आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हेही वाचा-VIDEO: मुसळधार पावसात वाहत होता रक्ताचा पाट; तरुणांनी तलवारीने केले सपासप वार आरोपीनं 24 जून रोजी वट पोर्णिमेच्या दिवशी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पळ काढला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या मागावर होते. मात्र त्यानं प्रत्येक वेळी पोलिसांना गुंगारा दिला होता. आरोपीनं आपल्या साथीदाराच्या मदतीनं शहारातील विविध भागांत आतापर्यंत 9 सोनसाखळ्या चोरल्या असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. शिवाय एक दुचाकी चोरीचा आरोपी देखील त्याच्यावर आहे. हेही वाचा-विरारमध्ये बँकेवर दरोडा; एका महिलेचा मृत्यू, बँकेच्या माजी अधिकाऱ्यानेच रचला कट आरोपी जाफरी हा सोन साखळी चोरल्यानंतर, ती साखळी कोंढव्यातील सराफ विशाल सोनी याला विकत असल्याचंही तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी सराफ व्यवसायिक विशाल सोनी याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 14 तोळे सोनं जप्त केलं आहे. या घटनेचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Theft

    पुढील बातम्या