मराठी बातम्या /बातम्या /पुणे /लॉकडाऊनमध्ये पुण्यातील फार्म हाऊसवर रंगली पार्टी; पोलिसांनी धाड टाकून केली कारवाई

लॉकडाऊनमध्ये पुण्यातील फार्म हाऊसवर रंगली पार्टी; पोलिसांनी धाड टाकून केली कारवाई

नियमांचे उल्लंघन करुन पार्टी करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.

नियमांचे उल्लंघन करुन पार्टी करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.

नियमांचे उल्लंघन करुन पार्टी करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.

पुणे, 29 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) रोखण्यासाठी सरकारने (Maharashtra Government) कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र, या लॉकडाऊनच्या काळातच पुण्यातील एका फार्म हाऊस (Pune Farm House)वर जंगी पार्टी रंगली होती. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी संबंधित फार्म हाऊसवर छापा टाकून कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Pune Police) 9 आरोपींना अटक सुद्धा केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील कुडजे गावाच्या हद्दीत असलेल्या एका फार्म हाऊसवर जोरदार पार्टी सुरू होती. या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळाली असता त्यांनी घटनास्थळी छापा टाकला. उत्तम नगर पोलिसांनी केलेल्या या कारवाई दरम्यान 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

वाचा: राज्यात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांची आता नोंदणी होणार

पोलिसांनी छापा टाकला असता या फार्म हाऊसवर उपस्थित असलेले सर्वजण दारुच्या धुंदीत दिसून आले. तसेच जोरदार डिजे सुद्धा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कारवाई करुन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच घटनास्थळावरुन दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

या फार्म हाऊसवर काही मुली सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींपैकी काही जण हे मुंबईतील असल्याचं समजतयं. या प्रकरणी पोलिसांनी फार्म हाऊसच्या मालकावरही गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन असताना अत्यावश्यक असेल तरच नागरिकांना घराबाहेर पडता येत आहे. तसेच इतर शहरांत जाण्यासाठी ई-पास आवश्यक आहे मात्र, असे असताना हे सर्वजण फार्म हाऊसवर कसे पोहोचले हा प्रश्न उपस्थित होत आहे.

First published:

Tags: Coronavirus, Maharashtra, Pune