पुणे, 19 ऑगस्ट : पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं मंदिर उभारलं (Modi Temple in Pune) होतं. हे मोदी मंदिर आता हटविण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून कानपिचक्या मिळाल्यानंतर हे मंदिर हटविण्यात आले असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येत आहे. या मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा शेजारील नगरसेवकाच्या कार्यालयात हलविण्यात आला आहे.
पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे (Mayur Mundhe) या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले होते. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे. याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च आलेला. 15 ऑगस्ट 2021 दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते.
मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली होती. मंदिराबाहेर असलेल्या, फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आली होती. या मंदिरावरून मला विरोधकांनी ट्रोल केलं गेलं तरी चालेल, पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याकरिता हे मंदीर उभारले असल्याचे मयूर मुंढेनी म्हटलं होतं.
देवच चेरीला गेला, आमच्या नवसाला कोण पावणार?
एका भक्ताने आपल्या देवाचे मा. मोदीजीं चे मंदीर नुकतेच औंध येथे बांधले परंतु काल रात्री पासून येथील मुर्तीच गायब असुन देवच चेरीला गेलाय. यामुळे आता यापुढे आपल्या देशातील पुढील समस्या कोण दूर करणार? यापुढे पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे? यापुढे आमच्या नवसाला कोण पावणार? अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीने भाजपला उपहासात्मक सवाल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, Pune