पुण्यात कोर्टासमोरच गँगवॉर, रावण टोळीच्या सदस्याने एकावर झाडली गोळी

पुण्यात कोर्टासमोरच गँगवॉर, रावण टोळीच्या सदस्याने एकावर झाडली गोळी

गोळीबार केल्यानंतर या रावण टोळीच्या सदस्याने तिथून पळ काढला. पोलीस सध्या त्याचा शोध घेत असून यात अधिक तपास करत आहे.

  • Share this:

पुणे, 07 मार्च : पुण्यात गोळीबाराचा झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या रावण टोळीच्या सदस्याने एका गुन्हेगारावर गोळीबार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रावण टोळीच्या एका सदस्याने शिवाजीनगर न्यायालयासमोर असलेल्या  कामगार पुतळ्याजवळ महाकाली गँगच्या एका गुन्हेगारावर गोळीबार केला आहे.

घटना घडताच परिसरात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली. यामध्ये थोडक्यात गोळी हुकल्यामुळे कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. भर न्यायालयासमोर गोळीबार झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गोळीबार केल्यानंतर या रावण टोळीच्या सदस्याने तिथून पळ काढला. पोलीस सध्या त्याचा शोध घेत असून यात अधिक तपास करत आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार रावण टोळी आणि महाकाली गँग या दोन्ही टोळ्या पिंपरी चिंचवडच्या आहे. भर दिवसा असा गोळीबार झाल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.

दरम्यान, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.

(बातमी अपडेट होत आहे...)


VIDEO : शहीद मेजर राणेंच्या पत्नीची खंत, तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 06:22 PM IST

ताज्या बातम्या