पुणे, 04 ऑक्टोबर : पिंपरी चिंचवड शहराला कोरोनाचा विळखा बसला होता. पण आता कोरोनाचा जोर ओसरतांना दिसत आहे. मात्र, आता आणखी एक मोठं संकट पिंपरी चिंचवडकरांच्या मागे लागलं आहे. एका तरुणीवर कुत्र्यांच्या घोळक्याने हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
हा प्रकार हिंजवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडला आहे. ही मुलगी पार्किंगमधून बाहेर जात होती. त्यावेळी अचानक एकाच वेळी सहा कुत्र्यांनी मुलीवर भीषण हल्ला केला. सहा कुत्र्यांनी अक्षरश: या मुलीचे लचेक तोडत होते. तिने जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे तिथे असलेल्या सुरक्षारक्षकाने काठी घेऊन धाव घेतली आणि तिची सुटका केली. ज्या मुलीवर हल्ला केला तिच्या शरीरावरील जखमा भीतीदायक आहेत.
तर दुसऱ्या एका घटनेमुळे कुत्र्यांचा एक घोळका अचानक समोर आल्यामुळे दुचाकीवरून घसरून पडून आनंद पुजारी नामक व्यक्तीचा नाहक बळी गेला.
पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी ते आळंदी परिसरात राहणाऱ्या प्रत्यक नागरिकांनी कुत्र्यांची धास्ती घेतली आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे पिंपरीतील नागरिक जीव मुठीत धरून वावरताना दिसत आहे.
दुपारी आजोबांवर झाले अंत्यसंत्कार, रात्री काकाने केला पुतणीवर अत्याचार
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दररोज सरासरी आठ व्यक्तीवर ही कुत्री हल्ले करून त्यांना जखमी करत आहे. यावरून ही समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येत आहे.
विशेष म्हणजे, कुत्र्यांच्या हल्ल्या नंतर जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी रेबीजच्या लशींचाही इथे तुटवडा असल्याने नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कुत्र्यांच्या धास्तीमुळे मॉर्निग वॉक करताना नागरिकांना हातात काठ्या घेऊन फिरव लागतं आहे.
मुलींना चांगले संस्कार दिले तरच बलात्काराच्या घटना थांबतील,भाजप नेत्याचे वक्तव्य
हिंजवडी ग्रामपंचायत तर आळंदी नगर परिषदेच्या अखत्यारित येते. महापालिका या भागातील कुत्रे पकडत नाही किंवा नसबंदी लसीकरण करत नाही. त्यामुळे नेमकं कुणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न या परिसरातील नागरिकासमोर उभा ठाकला आहे.