पुणे, 20 मार्च: पुणे, मुंबईसह राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. शुक्रवारीही तीन रुग्ण आढळून आल्यानं आता राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. प्रार्दुभाव रोखणं गरजेचं असल्याचं सांगत राज्य शासनाने उपाययोजना केल्या आहेत. तसेच गर्दी कमी करण्याचं आवाहन केले. प्रसंगी काही कठोर निर्णय ही घेतले आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर तसेच राज्यातील महानगरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसरीकडे पेट्रोल डिलर असोसिएशननं मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील पेट्रोल पंपाच्या वेळेत बदल करम्यात आला आहे.
हेही वाचा...
उद्या, शनिवारपासून (21 मार्च) 31मार्चपर्यंत पुणे शहरातील पेट्रोल पंप सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत चालू राहणार तर पुणे शहराबाहेरील तसेच पिंपरी-चिंचवडमधील पंप सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत चालू राहतील.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो तो आपापल्या परिने काळजी घेत आहे. पुण्यातील बावधन परिसरात असणाऱ्या सोसायट्यांना धूवून निर्जंतुकीकरण करण्यात आलं. सोडिअम हायपोक्लोराईड या औषधाची फवारणी करण्यात आली. सध्या कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव हा पुण्यात पाहायला मिळत आहे. सोसायट्यांमध्ये कोणताही कोरोनाचा परिणाम होऊ नये यासाठी बावधनमधील नगरसेवक किरण दगडे यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी संपूर्ण सोसायट्या, गटारी, घरे, बंगले, बसस्टँण्डस फवारण्यात आले. पुणे शहरात प्रथमच अशी फवारणी करण्यात आली. जर पुण्यातील प्रत्येक प्रभागात स्थानिक नगरसेवकांनी अशी फवारणी केली तर पूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्यास वेळ लागणार नाही, असं किरण दगडे यांनी सांगितलं आहे.
महानगरातील सर्व खासगी ऑफिसेस बंद राहणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
हेही वाचा...
संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरात राहण्याची वेळ आली आहे. सगळ्या देशातील पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाविरुद्ध जागतिक युद्ध सुरू आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्व लोक पुढे येत आहे. त्यांचे मी आभार मानतो. चित्रपटातील कलाकारांनी अत्यंत योग्यपणे जनजागृती करत आहे.
आपल्या सगळ्यांच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. यातून काही गोष्टी तुम्हाला खुपतील पण काही बदल करावे लागतील. बस आणि लोकल मुंबईचा श्वास आहे. पण बस आणि रेल्वे बंद होणार नाहीत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.