Home /News /pune /

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर शहरातून गावाकडे ओढ, किती वाजेपर्यंत करता येणार प्रवास? असे आहेत नवे नियम

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर शहरातून गावाकडे ओढ, किती वाजेपर्यंत करता येणार प्रवास? असे आहेत नवे नियम

कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव झाल्यानंतर हा व्हायरस अधिक वेगाने पसरू नये म्हणून अनेक गोष्टींवर निर्बंध आणण्यात आले.

कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव झाल्यानंतर हा व्हायरस अधिक वेगाने पसरू नये म्हणून अनेक गोष्टींवर निर्बंध आणण्यात आले.

Maharashtra Lockdown News : निर्बंध आणखी कडक करण्यात आल्यामुळे लोक आजपासूनच आपआपल्या गावाला निघाले आहेत.

पुणे, 14 एप्रिल : राज्यभरात पुढच्या 15 दिवसांसाठी कोरोनाबाबत नवी नियमावली (Maharashtra Lockdown News) जाहीर झाली आहे. निर्बंध आणखी कडक करण्यात आल्यामुळे लोक आजपासूनच आपआपल्या गावाला निघाले आहेत. पुण्याच्या (Pune) स्वारगेट स्थानकावरही कोकण, कोल्हापूर, साताराकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. अलिकडे हेच बसस्थानक बऱ्यापैकी रिकामं होतं, पण आज सकाळपासूनच गावाला जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. राज्यभरातील इतर शहरांमध्येही अशीच काहीशी स्थिती आहे. लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नवे निर्बंध जाहीर केले. त्यानुसार आज (बुधवारी) रात्री 8 वाजल्यापासून नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली असली तरीही याद्वारे केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे शहरातील ज्या नागरिकांना आपल्या गावी जायचं आहे त्यांना आज रात्री 8 वाजेपर्यंतच प्रवास करता येईल. हेही वाचा - Maharashtra Lockdown : कामगार, रिक्षाचालकांना मिळणार पैसे, मुख्यमंत्र्यांकडून 5476 कोटींचे पॅकेज जाहीर कसे आहेत नवे नियम? सर्वजनिक वाहतूक – सार्वजनिक वाहतूक खालील निर्बंधांसह सुरू राहील ऑटोरिक्षा - चालक अधिक 2 प्रवासी टॅक्सी (चारचाकी) - चालक अधिक पन्नास टक्के वाहन क्षमता बस- पूर्ण प्रवासीक्षमता, उभे प्रवासी बंदी - सर्व प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे. मास्क नसल्यास पाचशे रुपये दड केला जाईल - चारचाकी टॅक्सीमधे एखाद्या प्रवाशाने मास्क न घातल्यास तो प्रवासी आणि चालकालाही पाचशे रुपे दंड केला जाईल -प्रत्येक खेपेनंतर वाहने सॅनेटाईझ करणे आवश्यक आहे - भारत सरकारच्या नियमानुसार सर्व प्रवासी वाहनांचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी कोविड सुसंगत वागणुकीचे दर्शन घडवणेही गरजेचे आहे. टॅक्सी आणि ऑटोरिक्षांसाठी चालकाने स्वतःच्या आणि प्रवास्यांच्यामधे प्लास्टिकचे आवरण घालून संरक्षक कवच निर्माण करायला हवे. - सार्वजनिक वाहतुकीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास हे वैध कारण असेल. - बाहेरगावच्या ट्रेन्ससाठी रेल्वेप्रशासनाने उभे राहून कोणीही प्रवासी प्रवास करणार नाहीत, याची खातरजमा करावी. तसेच सर्व प्रवासी मास्क लावतील, हेही बघावे. - कोविडसुसंगत वागणूक न केल्यास पाचशे रुपयांचा दंड सर्व ट्रेन्समधेही लावावा. - सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देतानाच ती सुरळीतपणे व्हावी, यासाठी लागणाऱ्या नैमित्तिक सेवाही त्यात समाविष्ट करूनच ही परवानगी देण्यात आली आहे. त्यात हवाईसेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या कार्गोसारख्या सेवा तसेच तिकीटविषयक सेवांचाही समावेश आहे. - सार्वजनिक वाहतुकीने म्हणजे बस, ट्रेन किंवा विमानाने आलेल्या प्रवाशाला येताना किंवा जाताना घरी जाण्यासाठी वा घरून येण्यासाठी करावा लागणारा प्रवास वैध प्रवासतिकीट दाखवून करता येईल.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Pune (City/Town/Village)

पुढील बातम्या