कांदा बियाणाला मोठा भाव आला आणि चोरट्यांनी मारला डल्ला

कांदा बियाणाला मोठा भाव आला आणि चोरट्यांनी मारला डल्ला

मागीलवर्षी कांद्याला चांगला भाव राहिल्याने यंदा शेतकरी कांदा बियाण्यांसाठी लावलेली डेंगळयांची फुले (कांदयाची बोंडे) चोरून नेत आहेत.

  • Share this:

पुणे, 14 एप्रिल: कांदा चोरी (Onion theft) नंतर आता कांदा बियाणे (Onion seeds) चोरीचे प्रकार जिल्ह्यात घडू लागले आहेत. शेतात कांदा बियाणे तयार करण्यासाठी लावलेली डेंगळयांला आलेले बियाणे चोरीचा प्रकार पुणे जिल्ह्यातील नारोडी (ता.आंबेगाव) इथे उघडकीस आला आहे. अज्ञात चोरटयांनी बियाणे चोरून नेल्याची तक्रार शेतकरी विजय पवार (Farmers Vijay Pawar) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात (Ghodegaon Police Station) दिली आहे.

अलिकडे कांदा बियाणाला भाव वाढल्याने डेंगळे चोरीच्या घटना वाढल्या आहेत. बराखीतून कांदा चोरून नेल्याच्या घटना तसेच कांदयाचे रोप चोरून नेल्याच्या घटना सतत घडतात. मात्र मागीलवर्षी कांद्याला चांगला भाव राहिल्याने यंदा शेतकरी कांदा बियाण्यांसाठी लावलेली डेंगळयांची फुले (कांदयाची बोंडे) चोरून नेवू लागले आहेत. यावर्षी कांदा लागवड वाढणार आहे म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतात कांदा बियाणांसाठी डेंगळे लावले आहेत. त्यात थंडी व गर्मीतील चढ-उतारामुळे अनेक शेतक-यांच्या डेंगळयांमध्ये बियाणे नीट उगवली नाहीत. त्यामुळे यावर्षी कांदा बियाणांची टंचाई जाणवणार आहे. यासाठी आत्ता पासूनच शेतकरी कांदा बी विकत घेवून ठेवत आहेत.

Live Video: सराईत गुन्हेगारानं निवृत्त पोलिसाचा अडवला रस्ता; झटापटीत गुन्हेगाराचा मृत्यू

सध्या कांदा बियाणाला तीन हजार ते साडेतीन हजार रूपये किलो भाव सुरू आहे. त्यात ज्या शेतकऱ्यांनी कांदा बियाणांसाठी डेंगळे केले आहेत त्यांचे डेंगळे चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहेत. नारोडी येथील विजय बबनराव पवार यांनी सात गुंठयात केलेल्या संपूर्ण डेंगळयांची चोरी अज्ञात चोरटयांनी केली आहे. तीन महिन्यांचे पक्व झालेले व काढणीस आलेली डेंगळयांची मध्यरात्रीच्या सुमारास अतिशय शिताफिने कटरच्या सहाय्याने तोडून चोरून केली आहे. या सात गुंठयातून अंदाजे पंधरा किलो कांदा बियाणे निघाले असते व आजचा बाजार भाव पहाता यातून पन्नास हजार रूपयांचे कांदा बी तयार झाले असते मात्र चोरटयांनी चोरून नेल्याने कांदा लावण्यासाठी सुध्दा बी राहीले नाही तरी चोरटयांना पकडले जावे अशी मागणी शेतकरी विजय पवार यांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार करत आहेत.

First published: April 14, 2021, 10:47 PM IST

ताज्या बातम्या