Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

PUNE : घराच्या अंगणातून दीड वर्षांचा कृष्णा बेपत्ता; बिबट्याचा संचार वाढल्याने गावकरी भयभीत

PUNE : घराच्या अंगणातून दीड वर्षांचा कृष्णा बेपत्ता; बिबट्याचा संचार वाढल्याने गावकरी भयभीत

दीड वर्षांचा कृष्णा विलास गाढवे सकाळी साडे नऊ वाजता घराच्या अंगणात खेळत होता. बिबट्याचा संचार वाढल्याने गावकरी भयभीत झाले आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

आंबेगाव, 8 नोव्हेंबर : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील आंबेगावात एक दीड वर्षांचा मुलगा घराच्या अंगणात खेळता खेळता बेपत्ता झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

दीड वर्षांचा मुलगा कृष्णा विलास गाढवे सकाळी साडे नऊ वाजता घराच्या अंगणात खेळत होता. अचानक तो गायब झाल्याने परिसरात बिबट्याचा वावर ( Leopard) असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भागात ऊसाची शेती अधिक असल्यामुळे त्याच्या आड बिबट्याने मुलाला उचलून नेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (PUNE One and a half year old Krishna missing, villagers are scared due to the leopards )

गावकऱ्यांनी सर्व परिसरात शोध घेतला, मात्र मुलाचा शोध लागला नाही. ही घटना सोमवारी सकाळी आठ ते साडे नऊ दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे. कृष्णा विलास गाढवे असं या लहानग्याचं नाव आहे.

हे ही वाचा-Pune : नवरा नपुंसक असल्याचं तरुणीने केलं जगजाहीर; शेवटी पोलिसांकडून कारवाई

सोमवारी सकाळी कृष्णा हा दीड वर्षांचा चिमुरडा घराच्या अंगणात खेळत होता. साडे नऊ वाजेदरम्यान तो अचानक बेपत्ता झाला. घरातील सदस्यांनी त्याला परिसरात शोधलं, मात्र तो कुठेच सापडला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून त्यानेच मुलाला नेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृष्णा बेपत्ता होण्यामागे बिबट्याचाच हात असल्याची अधिकृत माहिती वा कोणतेही पुरावे अद्याप हाती आलेले नाहीत.

First published:

Tags: Leopard, Pune