मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणेकरांनो नो पार्किंगमध्ये गाडी लावताय का? मग तर हे वाचाच

पुणेकरांनो नो पार्किंगमध्ये गाडी लावताय का? मग तर हे वाचाच

पुणेकरांनो नो पार्किंगमध्ये वाहन लावणं पडेल महागात

पुणेकरांनो नो पार्किंगमध्ये वाहन लावणं पडेल महागात

पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास आता वाहनधारकांना मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

पुणे, 26 मे : पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास आता वाहनधारकांना मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या वाहनचालकांना मोठा दंड होणार आहे. दुचाकीला पहिल्यांदा टोइंगसह ७८५ रुपये तर चारचाकी वाहनांना 1074 रुपये दंड केला जाईल.

नो पार्किंगमध्ये वाहने लावल्यानं वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होतो. तसंच एखादे वाहन नो पार्किंमध्ये आढळल्यास त्या वाहनचालकाकडून दंड आकारताना अनेकदा वादाचे प्रसंगही निर्माण होतात. दरम्यान, आता वाहतूक विभागाकडून दंडाच्या रकमेची माहिती दिली आहे. वाहतूक पोलिसांकडून दंडाची रक्कम ही रोख स्वरुपात घेतली जात नाही. तसंच अद्याप ई चलन मशिनवर युपीआय किंवा क्यू आर कोडचा पर्याय नाहीय. त्यामुळे सध्या फक्त डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारेच दंड स्वीकारला जात असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिलीय.

नेत्यांच्या बड्डेला बैलगाडा शर्यत घेण्यास मनाई, अशी आहे संपूर्ण नियमावली 

एखाद्याचे वाहन नो पार्किंगमधून उचलल्यास दंडाची रक्कम भरत असताना त्या वाहनावर आधीच्या दंडाची रक्कम भरलेली नसेल तर त्यातील एक दंड भरावा लागेल. यामुळे वाहनधारकांना आधीच्या एका दंडाची आणि नव्याने झालेल्या दंडाची अशी दोन चलन भरल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होणार नाही. तसंच वाहतूक पोलिसांना या मशिनमध्येही कोणताच बदल करता येत नाही. या गोष्टी लक्षात घेऊन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांनी पोलिसांसोबत याबाबत वाद घालू नयेत असं आवाहनही वाहतूक शाखेने केलं आहे.

दुचाकी वाहनाने पहिल्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास टोइंगसह 776 रुपये तर दुसऱ्यांदा दंड झाल्यास 1786 रुपये दंड होईल. चारचाकी वाहनांसाठी हाच दंड पहिल्यांदा नियम मोडणाऱ्यास 1071 तर दुसऱ्यांदा असे घडल्यास 2071 रुपये दंड आकारला जाईल.

First published:
top videos