Home /News /pune /

भरचौकात 16 वेळा कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या, पुण्यातला थरकाप उडवणारा VIDEO

भरचौकात 16 वेळा कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या, पुण्यातला थरकाप उडवणारा VIDEO

घटनास्थळावर उपस्थितीत असलेले काही मित्रांनी अनिकेतला पकडले. पण, त्याने त्यांच्याही अंगावर कुऱ्हाड उगारली. त्यानंतर सपासप वार केले.

पुणे, 20 ऑक्टोबर : मागील भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्राची भर चौकात कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केल्याची अंगाची थरकाप उडवणारी घटना पुण्यातील औंधमध्ये घडली आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओसमोर आला आहे. औंधमधील  मलिंग चौकात  सोमवारी 19 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. क्षितिज चंद्रकांत वैरागर (वय 21 वर्ष) असं मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी अनिकेत दीक्षित (वय 23) याने क्षितिजची डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. क्षितिज हा औंध येथील चौकात आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी अचानकपणे अनिकेत मागून चालत आला आणि त्याने जोरात कुऱ्हाडीने क्षितिजच्या डोक्यावर वार केला. कुऱ्हाडीचा मार बसल्यामुळे क्षितिज जागेवरच कोसळला. तिथे उपस्थितीत असलेले चार मित्रांनी अनिकेतला पकडले. पण, त्याने त्यांच्याही अंगावर कुऱ्हाड उगारली. मित्रांना शिवीगाळ करत त्याने क्षितिजवर कुऱ्हाडीने वार करणे सुरूच ठेवले होते.  घटनास्थळावरून काही मित्र हे पळून गेले होते. तर तिथे असलेल्या काही लोकं हे निघून गेली. चोराशी रोमॅन्टिक चॅट करून प्रेमात पाडले, नंतर तुरुंगात पाठवले; पुण्यातील घटना अनिकेतला शेवटपर्यंत त्याच्या दोन  मित्रांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी ती दोन मित्रही घटनास्थळावरून निघून गेली. त्यानंतर अनिकेतने पुन्हा क्षितिजवर कुऱ्हाडीने वार केले. तब्बल 16 वेळा त्याने कुऱ्हाडीने वार केले होते. याच क्षितिजचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अनिकेत स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मृत क्षितिजचे मामा धनंजय गुलाब थोरात यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अनिकेतवर खूनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 'तिथेच ठोकले पाहिजे', पुण्यातील गुंडांच्या प्रतापामुळे पोलीस आयुक्त संतापले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी क्षितिज आणि अनिकेतमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून अनिकेतने क्षितिजवर कुऱ्हाडीने वार करून खून केला. आरोपी अनिकेत पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Pune crime, पुणे

पुढील बातम्या