दोघेही इंजिनिअर! पण पत्नीनेच रचला नवऱ्याला नपुंसक बनवण्याचा प्लॅन, कारण ऐकून पोलीसही हैराण

दोघेही इंजिनिअर! पण पत्नीनेच रचला नवऱ्याला नपुंसक बनवण्याचा प्लॅन, कारण ऐकून पोलीसही हैराण

'पती हा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तर त्याची पत्नी ही मेकेनिकल इंजिनिअर आहे. दोघे उच्चशिक्षित आहे. पण, लग्नाआधी पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले होते'

  • Share this:

पुणे, 27 ऑक्टोबर : नवरा-बायको (wife and husband) यांच्यातील भांडणे ही काही नवी बाब नाही. पण, एका पतीने आपल्या पत्नीवर नपुंसक (impotant) बनवण्याचा गंभीर आरोप केला आहे.  या प्रकरणी पुण्यातील (Pune) वारजे माळेवाडी (warje malwadi)पोलीस ठाण्यात पतीने पत्नीविरोधात तक्रार सुद्धा दाखल केली आहे.

दैनिक लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाउनच्या काळात या दाम्पत्याचे लग्न झाले होते. पण, लग्न होऊन काही महिने उलटत नाही, तेच पतीने पत्नीविरोधात पोलीस स्टेशन गाठले आहे. आरोप करणारा पती हा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तर त्याची पत्नी ही मेकेनिकल इंजिनिअर आहे. दोघे उच्चशिक्षित आहे. पण, लग्नाआधी पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले होते. तिने याची माहिती पतीलाही दिली. त्यानंतर दोघांनी चर्चा केली. त्यानंतर पत्नीने तरुणासोबत प्रेमसंबंध तोडून टाकले असल्याचं सांगितलं.

Maratha Reservation:मराठा आरक्षण सुनावणीबद्दल अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

लॉकडाउनच्या काळात लग्न झाल्यामुळे दोघांना हनीमूनसाठी जाता आले नाही. त्यामुळे हे जोडपे घरीच अडकून पडले होते. त्यानंतर अनलॉकची घोषणा झाली आणि सर्वत्र वाहतूक सुरू झाली. त्यानंतर हे दाम्पत्य हनीमूनसाठी महाबळेश्वरला गेले होते. पण ज्या हॉटेलमध्ये दोघे जण मुक्कामी होते. त्याच हॉटेलमध्ये पत्नीचा प्रियकर आला होता. हा व्यक्ती आपल्या पत्नीचा प्रियकर आहे, याची त्याला बिल्कुल कल्पना नव्हती. या तरुणाने महिलेल्या पतीसोबत मैत्री केली. त्यानंतर दोघांची चांगली गट्टी जमली. एवढंच नाहीतर तिघांनी मिळून हॉटेलमध्ये एक पार्टी सुद्धा केली. आता चांगली ओळख झाल्यामुळे महिलेच्या प्रियकराने आपणही वारजेमध्येच राहत असल्याचं सांगितलं. तसंच लॉकडाउनमुळे नोकरी गेली आहे. परिस्थिती सध्या बिकट आहे, अशी व्यथा पतीकडे मांडली. त्यामुळे पतीनेही आपल्या पत्नीच्या प्रियकराला वारजे येथील घरात राहण्यास परवानगी सुद्धा दिली.

फडणवीस आणि अजितदादांना कोरोनाची लागण, चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी, VIDEO

त्यानंतर एकदिवस महाबळेश्वरचे फोटो पाहण्यासाठी महिलेल्या प्रियकराचा मोबाइल पाहिला. त्यावेळी मोबाइलमध्ये आपल्याच पत्नीच्या घराचे फोटो आढळून आले. त्यामुळे पतीला संशय बळावला. पत्नी झोपल्यानंतर त्याने गुपचूप तिचा मोबाइल तपासला आणि सर्व मेसेज वाचले असता त्याला एकच हादरा बसला. आपण महाबळेश्वरमध्ये ज्या तरुणाला भेटलो होतो, तो आपल्या पत्नीचा प्रियकर आहे आणि दोघांचेही प्रेम प्रकरण सुरू आहे.

IPL 2020 : कधी घेणार युनिव्हर्सल बॉस निवृत्ती? स्वत: दिलं उत्तर

एवढंच नाहीतर दोघांनी मिळून  आपल्याला नपुंसक बनवण्याचा प्लॅन रचला होता. याची माहिती होताच पतीने आपले घर गाठले आणि सर्व प्रकार आई-वडिलांच्या कानी घातला. त्यानंतर वारजे पोलीस स्टेशनमध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. घटस्फोट घेण्यासाठी पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा सगळा प्रकार रचला होता, असं आता समोर आले आहे.

Published by: sachin Salve
First published: October 27, 2020, 5:45 PM IST

ताज्या बातम्या