मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात गव्यानंतर आता माणसांच्या सोसायटीत भरदिवसा बागडली हरणं, बघा VIDEO

पुण्यात गव्यानंतर आता माणसांच्या सोसायटीत भरदिवसा बागडली हरणं, बघा VIDEO

माणसांच्या गर्दीत अचानक काही काळासाठी वाट चुकून येणारे वन्यप्राणी मनाला आनंद देऊन जातात. पुण्यात असाच अनुभव एका सोसायटीतील रहिवाशांना आला.

माणसांच्या गर्दीत अचानक काही काळासाठी वाट चुकून येणारे वन्यप्राणी मनाला आनंद देऊन जातात. पुण्यात असाच अनुभव एका सोसायटीतील रहिवाशांना आला.

माणसांच्या गर्दीत अचानक काही काळासाठी वाट चुकून येणारे वन्यप्राणी मनाला आनंद देऊन जातात. पुण्यात असाच अनुभव एका सोसायटीतील रहिवाशांना आला.

पुणे, 31 डिसेंबर : वन्यप्राणी (wild animals) शहरात (city) येण्याच्या घटना अलीकडे वारंवार घडताना दिसतात. त्यातही बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी अनेकदा शहरात येतात.

पुण्यात मात्र एका सोसायटीत (society) चक्क हरिणांचा कळप (herd of deers) आला. त्यांचा सोसायटीत दबकत-बिचकत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.  शिवणे येथील एनडीएजवळील (NDA) जंगलातून (forest) या कळपाने जवळच्या सोसायटीत प्रवेश केल्याची माहिती समोर येते आहे.

एनडीएच्या जंगलात हरीण, मोर अशा विविध प्राणी-पक्ष्यांचा मुक्त वावर असतो. याच जंगलाला लागून असलेल्या आशीर्वाद सोसायटीत हा हरिणांचा कळप चुकून शिरला. नागरिकांनी आनंदून जात त्यांना बघत व्हिडिओत बंदिस्त केलं. सोसायटी आणि जंगलाला वेगळं करणारी भिंत कोसळल्यानं या हरिणांनी थेट सोसायटीमध्ये प्रवेश केला.

यात चार हरणं सोसायटीच्या पार्किंगशेजारी हळूहळू चालताना दिसत आहेत. काही लोक कुतूहलानं त्यांना वाकून पाहत आहेत. व्हिडीओ काढणाऱ्यांचं आपसातलं बोलणंही यात ऐकू येत आहे. एका स्त्रीचा आवाज 'चार हरणं आहेत' असं आश्चर्यानं म्हणताना ऐकू येतं. अजून एका पुरुषाचा आवाज त्या हरिणांना उद्देशून एकजण ' जावा तिकडं, माणसांच्या वस्तीत येऊ नका रे बाबांनो...' असे उपरोधिक उदगार काढतो आहे. दुसराही त्याला सहमती देतो.

काही काळापूर्वीच ९ डिसेंबर रोजी पुण्यात कोथरूडच्या परिसरात एक गवा शिरला होता. लोकांनी त्याला बघायला प्रचंड गर्दी केली. मात्र गवा गर्दीला पाहून बिथरला. त्यानं मुख्य रस्त्यावर धावायला सुरवात केली. त्याला या सगळ्यात इजा अझाली. शिवाय वनविभागानं त्याला तीनदा डार्ट मरून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यात गवा जीवानिशी गेला. त्यानंतरही आठवडाभरापूर्वी बावधनच्या एका तलावालगत गवा आढळून आला. त्याला मात्र वनविभागानं यशस्वीपणे कुठलीही इजा न होऊ देता त्याच्या अधिवासात पाठवलं.

First published:
top videos

    Tags: NDA, Pune, Wild animal