पुणेकरांनो, काळजी घ्या! नायडू हॉस्पिटलमध्ये घडला धक्कादायक प्रकार

पुणेकरांनो, काळजी घ्या! नायडू हॉस्पिटलमध्ये घडला धक्कादायक प्रकार

तीन दिवसांपूर्वी बीडमध्ये व्हेंटिलेटर बंद पडल्याने रुग्णांचे हाल झाल्याचं समोर आलं होतं.

  • Share this:

पुणे, 04 ऑगस्ट : पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना परिस्थितीत आटोक्यात आणण्याची युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असलेल्या नायडू हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

तीन दिवसांपूर्वी बीडमध्ये व्हेंटिलेटर बंद पडल्याने रुग्णांचे हाल झाल्याचं समोर आलं होतं.  पण, पुण्यातील नायडू रुग्णालयात वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात आला होता.  हॉस्पिटलमधील जनरेटर नादुरुस्त आहे. त्यातच वीज पुरवठा खंडीत झाला. 11 वाजून 36 मिनिटांनी महावितरणचा वीज पुरवठा बंद झाला. आता वीज गेल्यामुळे जनरेटर चालू होणे अपेक्षित होते परंतु, असे झाले नाही. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये काळोख पसरला होता.

सुदैवाची बाब म्हणजे, दहा मिनिटांनी वीज पुरवठा आपोआप पूर्ववत झाला म्हणून व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे जीव वाचले.  व्हेंटिलेटरच्या असलेल्या बॅटरी लो झाल्या होत्या. अंदाजे वीस ते पंचवीस रुग्ण व्हेंटिलेटरवर हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे.  लॉकडाउनमुळे जनरेटरची देखभाल दुरुस्ती करणारे कोणीच उपलब्ध त्याठिकाणी नाहीत.

जर महावितरणचा वीज पुरवठा वेळेवर सुरू झाला नसता तर पुढील मोठी जीवितहानी झाली असती. नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार सुरू आहे.

बीडमधील शासकीय कोरोना कक्षात असाच प्रकार घडला होता. यामुळे आरोग्य प्रशासनाचा आणि रुग्णालय विभागाचा भोंगळा कारभार समोर आला आहे.  अचानक वीज पुरवठा खंडीत झाला आणि जनरेटर नसल्यामुळे रुग्णांचे हाल झाले होते. उलट रूग्णांच्या नातेवाईकांनीच धावपळ करीत कक्षातीलच ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न करत होते. सदर रुग्ण गेवराई तालुक्यातील होता. अखेर त्या रुग्णाचा 31 जुलै रोजी मृत्यू झाला.

Published by: sachin Salve
First published: August 4, 2020, 9:41 AM IST

ताज्या बातम्या