पुणेकरांच्या चिंतेत भर घालणारी बातमी, सप्टेंबर महिन्याची धक्कादायक आकडेवारी समोर

पुणेकरांच्या चिंतेत भर घालणारी बातमी, सप्टेंबर महिन्याची धक्कादायक आकडेवारी समोर

सप्टेंबरमध्ये पुणे जिल्ह्यात कोविडचे 1.20 लाख नवीन रुग्ण आढळले. मार्च महिन्यात पहिल्यांदा नोंद झालेल्या रुग्णांच्या संख्येनंतर सप्टेंबर महिन्यांत हा आकडा सर्वात जास्त होता.

  • Share this:

पुणे, 21 ऑक्टोबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे कोरोनाच्या परिस्थितीशी महाराष्ट्र लढा देत आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. पुण्यात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

इंग्रजी दैनिक हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर महिना हा पुण्यासाठी सर्वात घातक ठरला आहे.  जिल्हा आरोग्य कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 1 ऑक्टोबरपर्यंत कोविडशी निगडित मृत्यूची संख्या 31.4 टक्के नोंद झाली. 7,335 रुग्णांपैकी 2,306 जणांचा एकाच महिन्यात मृत्यू झाला आहे. पुण्यात ऑगस्ट महिन्यामध्ये 29.7 टक्के म्हणजेच 2,177 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

जिल्हा आरोग्य कार्यालयाने केलेल्या विश्लेषणामध्ये असेही दिसून आले आहे की, 61-70  वयोगटातील लोकांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे. याची टक्केवारी ही 30 टक्के आहे. त्यानंतर 22 टक्के हा 51-60 वयोगटातील लोकांचा मृत्यू झाला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरमध्ये पुणे जिल्ह्यात कोविडचे 1.20 लाख नवीन रुग्ण आढळले. मार्च महिन्यात पहिल्यांदा नोंद झालेल्या रुग्णांच्या संख्येनंतर सप्टेंबर महिन्यांत हा आकडा सर्वात जास्त होता.

सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या ही सर्वाधिक होती. त्यामुळे येणाऱ्या सण-उत्सवाच्या काळात कोरोनाच्या दुसर्‍या लाटाची शक्यता नाकारता येत नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

'कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, सप्टेंबर महिन्यात ही संख्या सर्वाधिक होती. कारण, आपल्याकडे नवीन रुग्णांच्या केसेसमध्ये मृत्यूची घट दिसून आली आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार असे म्हटले जात आहे. तशी शक्यताही नाकारता येत नाही. पण, आपण ही लाट रोखू शकतो. लोकांनी जर सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर  न करणे, योग्य ती खबरदारी जर घेतली नाहीतर दुसरी लाट येण्यावाचून कुणीही रोखणार नाही. कोविड संपला असं कुणीही गृहीत धरू नये, सर्वांनी आणखी काळजी घेण्याची गरज आहे', असं आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.

Published by: sachin Salve
First published: October 21, 2020, 10:00 AM IST
Tags:

ताज्या बातम्या