मराठी बातम्या /बातम्या /पुणे /कत्तलीसाठी आणलेल्या 42 गायींची सुटका, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कत्तलीसाठी आणलेल्या 42 गायींची सुटका, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

दौंड शहराजवळ लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत कॅनॅाल जवळच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये 16 गायी कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्या होत्या.

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

दौंड, 29 मार्च : पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड शहर (Daund city) आणि परिसरात कत्तलीसाठी आणलेल्या 42 गायींची (Cow) पोलिसांच्या तत्परतेमुळे सुटका झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील इदगाह मैदानाजवळ खाटीक गल्लीत 26 गायी आणि दौंड शहराजवळ लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत कॅनॅाल जवळच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये 16 गायी कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन या गायींची सुटका केली.

प्रेरणादायी! अननस, निवडुंगातून उगवलं 'बीज'; अरुंधतीचा 'आऊट ऑफ बॉक्स' स्टार्टअप

या प्रकरणी आबिद कुरेशी, आसिफ कुरेशी व वाजिद कुरेशी (तिघे रा. खाटीक गल्ली, दौंड), अहमद अब्बास कुरेशी (रा. कुंभार गल्ली, दौंड) व त्याच्या अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दौंड पोलिसांचे परिविक्षाधीन उपअधीक्षक मयूर भूजबळ यांच्यासह पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि त्यांच्या टीमने केली.

वेळीच घ्या माहिती, हे आहेत बोन कॅन्सरचे प्रकार, जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

चारही संशयित आरोपी व त्यांचे साथीदार सध्या फरार आहेत. गायींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली चार वाहने पोलिसांनी जप्त केली आहे. त्यानंतर पकडलेल्या गायींची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे.

First published:

Tags: दौंड, पुणे