मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

बुधवार पेठेतील प्रेयसीला छळले, कुख्यात गुंडाने पोलिसाचा चिरला गळा, पुण्यातील प्रकरणाचा खुलासा

बुधवार पेठेतील प्रेयसीला छळले, कुख्यात गुंडाने पोलिसाचा चिरला गळा, पुण्यातील प्रकरणाचा खुलासा

महिलेला संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होते. त्यावरून महाजन आणि सय्यद यांच्यात दीड महिन्यापूर्वी जोरदार वादावादीही झाली होती.

महिलेला संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होते. त्यावरून महाजन आणि सय्यद यांच्यात दीड महिन्यापूर्वी जोरदार वादावादीही झाली होती.

महिलेला संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होते. त्यावरून महाजन आणि सय्यद यांच्यात दीड महिन्यापूर्वी जोरदार वादावादीही झाली होती.

पुणे, 05 मे :  पुणे पोलीस (Pune Police) दलातील फरासखाना (Faraskhana Police Station) पोलीस ठाण्याचे कर्मचारी समीर सय्यद (Sameer Syed) यांची रात्री कुख्यात गुन्हेगार प्रवीण महाजन (Praveen Mahajan) याने गळा चिरून हत्या केली, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवीण महाजनला फरासखाना पोलिसांनी अटक केली. मात्र, हा सगळा प्रकार किरकोळ वादातून झाला असल्याचं पोलिसांकडून रेकॉर्डवर नोंदवण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यातील फरासनखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत समीर सय्यद यांनी मंगळवारी रात्री 1 वाजता प्रवीण महाजन यांनी चाकूने गळा चिरून हत्या केली.  प्रत्यक्षात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या एका महिलेच्या वादातून हा खून झाल्याचं कळतं आहे. पोलीस हवालदार समीर सय्यद हे आरोपी महाजन याच्याशी प्रेमसंबंध असलेल्या महिलेला संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होते. त्यावरून महाजन आणि सय्यद यांच्यात दीड महिन्यापूर्वी जोरदार वादावादीही झाली होती. तोच राग डोक्यात धरून महाजन याने सय्यद यांचा खून केला, असल्याची चर्चा पोलीस दलात आहे.

बंगाल हिंसाचारावर मिथुन चक्रवर्तींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मात्र, पोलिसांची इभ्रत वाचवण्यासाठी पोलिसांनी या हत्येला रेकॉर्डवर किरकोळ वादाच स्वरूप दिलं आहे. सदर महिलेच्या तपासाबाबत पोलिसांना विचारणा केली असता ती मिळून येत नसल्याची सारवासारव पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, फरासखाना पोलीस स्टेशन यांनी करायचा प्रयत्न केला. पण कर्मचाऱ्याचे प्रताप माहिती नसल्याचं सांगून त्यांनी त्यांचीच अकार्यक्षमता दाखवून दिली.

त्यामुळे आता यापुढचा तपास तरी पोलिसांनी नीट करून सत्य घटना कागदावर आणून तपास करणं गरजेचं आहे. या प्रकरणातील महिला शोधून तिच्याकडे तपास करणं गरजेचं आहे, त्यासाठी या महिलेच्या जबाबाची गरजेचा आहे. मात्र, पोलीस तो घेणार की नाही असा प्रश्न आहेएकूण या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, साक्षीनं शेअर केला VIDEO

पोलीस कर्मचारी देहविक्री करणाऱ्या महिलांना त्रास देतात आणि हे प्रकरण पोलीस कर्मचाऱ्याच्या खूनापर्यंत जातं आणि तरीही वरिष्ठ दुर्लक्ष करतात आणि खून झाल्यानंतर प्रकरणाची सत्यता उघड होऊ नये यासाठी प्रयत्न करतात हे दुर्दैवी आहे. पुणे पोलिसांनी सापेक्ष भूमिका घेणं गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे पोलीस दलातील दुषप्रवृत्तीना आळा घालणं ही गरजेचं आहे.

श्रीकृष्ण टॉकीजवळ काय घडलं?

फरासखाना पोलीस स्टेशनचे कर्मचारी समीर सय्यद (वय 48) हे बंदोबस्त आटोपून घरी चालले होते. सय्यद हे खडक पोलीस लाईनमध्ये राहायला होते. सय्यद हे श्रीकृष्ण टॉकीजवळ पोहोचले असता प्रवीण महाजनने याने त्यांच्यावर हल्ला केला आणि चाकूने गळा चिरला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून प्रवीण महाजनला अटक करण्यात आली आहे. प्रवीण महाजन हा एक वर्षासाठी तडीपार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

IPL 2021 : जडेजा हर्षा भोगलेंना म्हणाला, 'मला त्या नावाने बोलू नका'

तर बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ सय्यद यांचा खून झाला, त्या ठिकाणाहून 50 मिटर अंतरावर एका देहविक्री करणाऱ्या महिलेची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. नेमका खून का आणि कशासाठी करण्यात आला, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र, रात्रीची संचारबंदी असताना दोन खून घडल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

First published: