लशीच्या खरेदीवरुन पुण्यात राजकारण! भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप तर महापौर म्हणतात...

लशीच्या खरेदीवरुन पुण्यात राजकारण! भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप तर महापौर म्हणतात...

मुंबई महापालिकेने (BMC) लशीच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला असताना इकडे पुण्यात या प्रस्तावित लस खरेदी ग्लोबल टेंडरवरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

  • Share this:

पुणे, 13 मे:  मुंबई महापालिकेने (BMC) लशीच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला असताना इकडे पुण्यात  या प्रस्तावित लस खरेदी ग्लोबल टेंडरवरून (Global tender for covid-19 vaccine) राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. लस खरेदीची परवानगी मुंबई महापालिकेला मिळते, मग पुणे महापालिकेला (PMC) का नाही? असा सवाल भाजपचे पुणे मनपाचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी उपस्थित केलाय.महाविकास आघाडीचं सरकार पुणे मनपात भाजपची सत्ता असल्या कारणाने पुणेकरांना सापत्न भावाची वागणूक देत असल्याचा आरोप गणेश बीडकर यांनी केलाय.

राज्य सरकारकडून सापत्न वागणूक

पुणे मनपाला लस खरेदीची परवानगी द्यावी, या मागणीचे पत्र आपण राज्य सरकारला गेल्या 20 तारखेलाच पाठवले होते पण अद्यापही सरकारने त्याचे साधे उत्तरही दिले नसल्याचा आरोप बीडकर यांनी केलाय. पुणे महापालिकेचे सभागृह नेते असलेल्या गणेश बिडकर यांनी २० एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिलं होतं. त्यावर अजूनही परवानगी किंवा कोणताही प्रतिसाद राज्य सरकारकडून आला नाही, असा बिडकर यांचं दावा आहे.

मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे आहेत, मात्र ते केवळ मुंबईचेच मुख्यमंत्री असल्याची भूमिका घेतात असा आरोपही त्यांनी केलाय. कोरोना लसीकरण मोहिमेचा विषय केंद्र सरकारने राज्याकडे सोपवल्यानंतर पुणे मनपानेही लस खरेदीची तयारी दाखवली आहे पण यासंबंधीच्या मार्गदर्शक सुचनाच राज्य सरकारने जारी केलेल्या नाहीत, त्यामुळे पुणे मनपा प्रशासनाने लस खरेदीसाठी यापुढे नेमकी कशी पावले उचलावीत, असा प्रश्न बीडकर यांना सतावतोय पण बीडकर यांच्या या राज्य सरकारवरील आरोपांवर भाजपच्याच इतर पदाधिकाऱ्यांनी सावध मौन बाळगलं आहे. तर, पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांनी लस खरेदीसाठीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून त्यासंदर्भात राज्य सरकारशी रितसर पञव्यवहारही सुरू आहे, असं सांगितलं आहे.

कोरोना कॉलर ट्यूनवरुन उच्च न्यायालयही भडकलं, कठोर टीका करत सरकारला फटकारलं

लवकरच ग्लोलबल टेंडर काढणार!

दरम्यान, बीएमसीच्या  पुणे मनपा देखील लस खरेदीसाठी लवकरच ग्लोबल टेंडर्स काढण्याच्या विचारात असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच दिलीय.  पुणेकरांसाठी जिथून कुठून कोरोना लस मिळेल, तिथून ती तात्काळ खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न आहे,  पुण्यातील सिरम इनस्टिट्यूटला (Serum Institute of India) देखील आम्ही यासंदर्भात तीन विनंतपत्र दिल्याचं महापौरांनी सांगितलं.

...आणि 2100 रुपयांच्या चेकसाठी अजित पवारांनी केला आमदार निलेश लंकेंना फोन

महापौरांचं सूचक मौन

पुण्यातील लसीकरण कैंद्राच्या ऑनलाइन डँशबोर्डचं अनावरण महापौर आणि आयुक्तांच्या हस्ते झालं. त्यावेळी राज्य सरकार पुणे मनपाला ग्लोबल टेंडरसाठी परवानगी देत नसल्याचा आरोप भाजपचेच गटनेते गणेश बीडकर यांनी केला होता. त्याबद्दल  महापौरांनी जाणिवपूर्वक अधिकचं भाष्य करणं टाळलंय. थोडक्यात, पुण्यात आता लस खरेदीसंबंधीच्या आरोप प्रत्यारोपांवरून भाजप पदाधिकाऱ्यांमध्येच एकवाक्यता नाहीये का? असा सवाल विरोधकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 14, 2021, 12:03 PM IST

ताज्या बातम्या