पुणे, 17 ऑक्टोबर : राज्यात परतीच्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. पुण्यातही परतीच्या पावसाने धुमशान घातले आहे. परंतु, जनता वसाहतीमध्ये पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटल्यामुळे 40 घरात पाणी शिरले.
शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. जनता वसाहतीतून पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला जाणारी पाईपलाईन आहे. अचानक रात्री ही पाण्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले. तब्बल 40 घरांमध्ये पाणी शिरले होते. काही घरात अक्षरश: गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
पुण्यातील जनता वसाहतीत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली, 40 घरांमध्ये शिरलं होतं पाणी pic.twitter.com/cptNaYxOyB
पाण्याचा प्रवाह इतका होता की, पाण्याच्या प्रेशरनं 9 जण किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
45 वर्ष जुनी ही पाईपलाईन आहे. अनेक वेळा पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना वारंवार घडल्या आहे. त्यामुळे ही पाईपलाईन बदलण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
तीन दिवसांपूर्वी पुण्यात पावसाने धुमशान घातलं होतं. अनेक भागांमध्ये पाणी साचलं होते. पावसानं रौद्र रुप धारण केल्यानं ओढे आणि नद्यांना पूर आला आणि वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं. रस्ते जलमय झाले होते.
सेल्फीच्या नादात दोन तरूण बुडाले
दरम्यान, पुण्यात सेल्फी काढण्याचा मोह 2 तरुणांच्या जीवावर बेतला. सेल्फी काढताना तोल जाऊन दोन्ही तरुण पुण्यातील भिडे पुलावरुन मुठा नदीत पडले आणि पुरात वाहून गेले. ओम तुपधर (वय-17) आणि सौरभ कांबळे (वय- 20, दोघे रा. ताडीवाला रोड) अशी पुरात वाहून गेलेल्या तरुणांची नावं आहेत.
ताडीवाला परिसरात राहणारे दोघे डेक्कनला नवरात्र, दसरा सणासाठी कपडे खरेदीसाठी आले होते. भिडे पुलावर फोटो काढण्यासाठी एक जण थांबला असता पाण्याचा प्रवाह वाढला. मित्र वाहत आसताना वाचवायाला गेलेला तरुणही गेला वाहून गेला. अग्निशमन दलाकडून दोन्ही तरुणांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.