Home /News /pune /

पुणेकर खबरदार जर बायकोशी भांडाल, व्हावं लागेल क्वारंटाईन!

पुणेकर खबरदार जर बायकोशी भांडाल, व्हावं लागेल क्वारंटाईन!

जो बायकोशी भांडणार त्याला समज देण्यात येईल आणि तरी त्याने ऐकलं नाही तर त्याला होम क्वारंटाईन न करता थेट पोलिसांच्या मदतीने संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल.

    पुणे, 17 एप्रिल : लॉकडाऊनमुळे सगळ्यांना घरात बसण्याची वेळ आली आहे. यामध्ये आता जोडप्यांची भांडणं होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घरात नवरा आणि बायकोची सतत भांडण होत असल्याचं समोर आलं आहे. ही भांडणं थांबवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण स्तरावर एक युक्ती लढवण्यात आली आहे. जो बायकोशी भांडणार त्याला समज देण्यात येईल आणि तरी त्याने ऐकलं नाही तर त्याला होम क्वारंटाईन न करता थेट पोलिसांच्या मदतीने संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. या देशात लोकांनी लॉकडाऊनची लावली वाट, पोलिसांनी 18 जणांना गोळ्या घालून केलं ठार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी रात्री हा आदेश काढला. लॉकडाऊनच्या काळात नवरा-बायकोमधील वाद वाढल्याने असा आदेश काढावा लागली अशी माहिती त्यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात संचारबंदू लागू करण्यात आली आहे. अशात नियमांचं पालन काटेकोरपणे होणंही गरजेचं आहे. राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचं संकट, जाणून घ्या तुमच्या शहरात कसं असेल हवामान गाव पातळीवर महिला दक्षता समित्यांमध्ये ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्या, अंगणवाडीसेविका, बचत गट सांभाळणाऱ्या महिलांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या भांडखोर नवऱ्यांचं समुपदेशन करण्यासाठी जिल्हा पातळीवर हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता या भीतीने का होईना आता घरातील वाद थांबतील अशी अपेक्षा आहे. रतन टाटा यांना 'भारतरत्न' द्या, सोशल मीडियावर ऑनलाईन याचिकेला लाखोंचा पाठिंबा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या