Home /News /pune /

pune news : पुण्यात अनलॉक नाहीच, कोरोनाचे निर्बंध जैसे थे!

pune news : पुण्यात अनलॉक नाहीच, कोरोनाचे निर्बंध जैसे थे!

कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुणे महानगरपालिकेने निर्बंध कायम (New restrictions in Pune)ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    पुणे, 31 जुलै : कोरोनाची लाट ओसरत असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात यावे अशी मागणी होत आहे. पण, तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून निर्बंध शिथिल करण्यास सरकारने मनाई केली आहे. पुणे महापालिकेनं सुद्धा आपल्या नियमात कोणतेही बदल न करता शहरात असलेले निर्बंध जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी तिसऱ्या लाटेची भीती मात्र कायम आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुणे महानगरपालिकेने  निर्बंध  कायम (New restrictions in Pune)ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवांमधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर शनिवार आणि रविवार पूर्णत: बंद राहतील. तसंच पुण्यातील मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णपणे बंद राहणार आहे. रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार-रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत सुरू राहिल. काय आहे नियमावली लोकल ट्रेनमधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांसाठी, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा, यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी असेल. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी (उद्याने), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवांव्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी म्हणजेच वर्किंग डेच्या दिवशी 50 टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा आणि कोविड-19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू राहतील. उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत. खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या