पुण्यातल्या हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार; 4 वर्षांच्या मुलाला साखरेऐवजी खायला दिला धुण्याचा सोडा

पुण्यातल्या हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार; 4 वर्षांच्या मुलाला साखरेऐवजी खायला दिला धुण्याचा सोडा

पुण्यातील (Pune news) एका हॉटेलमध्ये (Hotel) जेवायला गेले असता, चार वर्षाच्या मुलाला साखरेऐवजी (Sugar) धुण्याचा सोडा (washing soda)दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या चार वर्षाच्या चिमुकल्यानं तो खाल्ल्याने जीभ पोळून निघाली आहे.

  • Share this:

पुणे, 24 डिसेंबर: पुण्यातील (Pune) एका हॉटेलमध्ये (Hotel) जेवायला गेले असता, चार वर्षाच्या मुलाला साखरेऐवजी (Sugar) धुण्याचा सोडा (washing soda) दिल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. या चार वर्षाच्या चिमुकल्यानं साखर समजून एवढा मोठा सोडाच खाल्ल्यानं त्याची जीभ पूर्णपणे भाजून (tongue burnt) निघाली आहे. ही घटना रविवारी घडली असून तो आपल्या आजोबांसोबत हॉटेलमध्ये गेला होता. या प्रकरणी हॉटेल मालक आणि वेटरविरोधात  पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

सणस मैदानाजवळच्या (Sanas Ground) 'विश्व' हॉटेलमध्ये (Vishwa Hotel)  हा मुलगा आजोबांबरोबर जेवायला गेला होता. याप्रकरणी हॉटेल मालक आणि वेटर विरोधात दत्तवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारचा दिवस असल्यानं 65 वर्षीय रमेश कोष्टी आपल्या दोन नातवंडांना घेऊन सारसबागेत फिरायला गेले होते. यावेळी आजोबा रमेश कोष्टी यांनी आपला चार वर्षांचा नातू विहान कोष्टी आणि दहा वर्षांची नात कुबेरा कोष्टी यांना सोबत घेऊन गेले होते. सारसबागेत सर्व खेळून झाल्यानंतर मुलं भुकेली होती, म्हणून संध्याकाळी 6.30 वाजता हे तिघं सणस मैदानाजवळील विश्व हॉटेलमध्ये काहीतरी खाण्यासाठी गेले.

आजोबांनी मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार, "विहान जेव्हा किंचाळला तेव्हा मी वॉशरूममध्ये गेलो होतो. त्याचा आवाज ऐकल्यानंतर मी ताबडतोब टेबलाकडे धावत आलो. तेव्हा मी तिथे पाहिलं तर विहानची जीभ लाल झाली होती. तो मोठ्याने रडत होता. मी त्याला पाणी प्यायला दिलं पण याचा काही उपयोग झाला नाही. मी जेव्हा विहानला विचारलं की त्यानं काय खाल्लं, तेव्हा त्यानं पांढरी पावडर असलेल्या एका भांड्याकडे बोट दाखवलं. त्यानंतर मी त्याची चव चाखली तेव्हा मला समजलं की ती साखर नसून धुण्याचा सोडा आहे."

सुरुवातीला काय करावं हे मला कळालं नाही. त्यामुळं मी लगेच विहानला घेऊन क्लिनिकमध्ये जायचं ठरविलं. पण रविवार असल्यामुळे बरेच क्लिनिक बंद होते. त्यामुळे मी त्याला घेऊन दीनानाथ रुग्णालयात गेलो. तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की त्याची धुण्याच्या सोड्यामुळं जळाली असून त्याच्या जीभेला जखमा झाल्या आहे. त्यानंतर आम्ही सोमवारी हॉटेलचा मालक आणि वेटरच्या विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि मंगळवारी गुन्हा दाखल झाला. CCTV फुटेज साह्याने संबंधित वेटरची ओळख पटली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: December 24, 2020, 7:39 PM IST
Tags: crimepune

ताज्या बातम्या